सेवेचा ठसा कायम; बदलीनंतरही वाठारकरांच्या मनात अविनाश माने संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) उत...
सेवेचा ठसा कायम; बदलीनंतरही वाठारकरांच्या मनात अविनाश माने
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
उत्तर कोरेगांव तालुक्यांतील शांतप्रिय म्हणून वाठार पोलीस ठाण्याची ओळख आहे. आणि याच वाठार पोलीस ठाण्यातील सोमवारी रात्री उशिरा सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांची नुकतीच सातारा जिल्हा नियंत्रण कक्षात बदली झाली असून अविनाश मानेंच्या बदलीने पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसह परिसरांतील सर्वसामान्य नागरिक शेतकरी वर्ग पत्रकार तसेच शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी देखील भावुक झाले आहेत. माझ्या करंजखोप गावच्या हद्दीमधील वाठार पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अविनाश माने साहेब यांची बदली झाल्याचे एका सेवानिवृत्त माजी सैनिकाकडून संपर्काद्वारे त्यांनी मला माहिती दिली. हे ऐकून माझे मन गहिवरून गेले होते मला यावर विश्वास बसत नव्हता... मात्र मी लगेच सातारा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला असता बदली झाल्याचे समजले, खरंच मन खूप गहिवरून गेले ज्या पोलीस ठाण्यात नेहमीच जाणे-येणे असतं तर कधी आम्ही गेलो असता किंवा काही कामानिमिंत्त काही अडीअडचणी निमिंत्ताने कधीही संपर्क साधला तर आदरणीय अविनाश माने खूप प्रेमाने मन भरून बोलायचे तसेच माझ्याबद्दल साहेबांना खूप अभिमान होता. आज स्वतः अधिकारी असून सुद्धा नेहमीच संपर्कातून समक्ष संभाजीराव म्हणून साहेबांचा आवाज मला कायम होता. खरंच साहेबांना पुढील काही दिवसानंतर वाठार पोलीस ठाण्यात संधी मिळावी, साहेबांनी पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील राहिले, वाठार पोलीस ठाणे च्या परिसरांतील पत्रकार तसेच सर्वसामान्य शेतकरी वर्ग जनता नागरी यांच्याशी साहेबांनी एक प्रेमाचं नातं निर्माण केलं होतं. आदरणीय साहेब आपली पुन्हा भेट ही वाठार पोलीस ठाण्यात होणार !

No comments