विज्ञान प्रदर्शनात सनपुले आश्रमशाळेचे यश; जलतारा प्रयोगाने परीक्षकांचे लक्ष वेधले चोपडा प्रतिनिधी (संपादक -;- हेमकांत गायकवाड) चोपडा :- एक...
विज्ञान प्रदर्शनात सनपुले आश्रमशाळेचे यश; जलतारा प्रयोगाने परीक्षकांचे लक्ष वेधले
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -;- हेमकांत गायकवाड)
चोपडा :- एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प,यावल अंतर्गत बीटस्तरीय विज्ञान प्रदर्शन शासकीय आदिवासी प्राथमिक आश्रमशाळा मालोद ता.यावल येथे दिनांक १३ जानेवारी वार मंगळवार रोजी पार पडले. या विज्ञान प्रदर्शनात सनपूले ता.चोपडा येथील अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता सातवी वर्गात शिकणारा विद्यार्थी विक्रम राजू पावरा व सहावी वर्गात शिकणारा विद्यार्थी रोशन सर्जन मावले यांच्या जलतारा प्रयोगाला यावेळी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. कमी खर्चात केलेला प्रयोग, शेती, मातीचे जीवनमान उंचावणारा संदेश, योग्य सादरीकरण, तंत्रज्ञानाचा केलेला वापर या बळावर त्यांना बक्षीस प्राप्त झाले. सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्रजी मुसळे, मालोद आश्रमशाळेचे मुख्याध्यापक जी.सी.कटारे, अनुदानित आश्रमशाळा हातेड येथील प्राथमिक मुख्याध्यापक जितेंद्र पाटील
यावेळी उपस्थित होते.जलतारा या प्रयोगासाठी विद्यालयाचे शिक्षक सागर पवार, अरविंद उत्तम मोरे, गजानन पाटील,प्रवीणचंद्र केदारे यांनी मार्गदर्शन केले. जलतरा संशोधक प्रा.डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी युट्युब या सोशल मीडिया माध्यमातून संवाद साधत प्रेरणा दिली होती. सदर प्रदर्शनासाठी अनंत पाटील, मनीषा पाटील, विजय पालीवाल, जगदीश सोनवणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. चोपडा बीट अंतर्गत विज्ञान प्रदर्शनात यशस्वी झाल्याबद्दल प्रकल्पाधिकारी अरुणजी पवार, सनपूले आश्रमशाळेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव गणेश पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नितीन पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील, विज्ञान शिक्षक भूपेंद्र पाटील तसेच इतर शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शक शिक्षक, विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले व आगामी प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.


No comments