adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नेताजींच्या पावन भूमीत देशभक्तीचा जागर – मलकापूरात जयंतीपूर्वी भव्य स्वच्छता अभियान

 नेताजींच्या पावन भूमीत देशभक्तीचा जागर – मलकापूरात जयंतीपूर्वी भव्य स्वच्छता अभियान    अमोल बावस्कार बुलढाणा: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...

 नेताजींच्या पावन भूमीत देशभक्तीचा जागर – मलकापूरात जयंतीपूर्वी भव्य स्वच्छता अभियान 


 

अमोल बावस्कार बुलढाणा:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

विदर्भाच्या प्रवेशद्वारी असलेल्या ऐतिहासिक मलकापूर शहराला देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भारतातील शेवटची जाहीर सभा ज्या पावन भूमीत झाली, त्या मलकापूर शहरात येत्या २३ जानेवारी रोजी नेताजींची जयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.

या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज नेताजी सुभाषचंद्र बोस स्मारक परिसरात स्वच्छता व सौंदर्यीकरण अभियान राबविण्यात आले. स्वच्छ परिसर, स्वच्छ विचार आणि देशभक्तीचा जागर या संदेशासह हा उपक्रम पार पडला.

या स्वच्छता मोहिमेत प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अजय टप, शहर युवा प्रमुख बळीराम बावस्कार, पत्रकार श्रीकृष्ण भगत, अशोक गाढवे, मलकापूर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी भुसारी साहेब, बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता मितील कुलकर्णी, अग्निशमन दलाचे कर्मचारी वासुदेव भोपळे, संतोष टाक, दिव्यांग संघटनेचे नीलेश चोपडे तसेच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची टीम मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.

नेताजींच्या जयंतीपूर्वी स्मारक परिसर स्वच्छ व सज्ज ठेवून देशप्रेम, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीचा आदर्श मलकापूरकरांनी घालून दिला आहे. या उपक्रमाचे शहरातील नागरिकांकडून जोरदार स्वागत व कौतुक होत आहे.

“तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन” — या नेताजींच्या अमर घोषणेला अभिवादन करत मलकापूर शहर पुन्हा एकदा देशभक्तीच्या रंगात न्हाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

No comments