यावल येथील जुळ्या भावांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल शहरातील महाजन गल्ल...
यावल येथील जुळ्या भावांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल शहरातील महाजन गल्ली येथील एकता चौक परिसरात राहणारे प्रगतीशील शेतकरी योगेश सुरेश फेगडे यांच्या जुळ्या मुलांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
योगेश फेगडे यांची जुळी मुले जय व दीप यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरात आनंदाचे वातावरण होते. यावेळी महिला, पुरुष, लहान मुले तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी प्रगतिशील शेतकरी प्रमोद नेमाडे, पराग बोरोले, अनिल कोलते, यावलचे माजी प्रभारी नगराध्यक्ष व भाजप उपगटनेते राकेश कोलते, तसेच सुनील पाटील, प्रमोद करांडे, अनिल फेगडे, रामभाऊ करांडे, श्रीधर फेगडे, धीरज महाजन, गोलू चौधरी, किशोर चौधरी, आशिष पाटील सर, गणेश महाजन, विलास चौधरी, समाधान राजपूत, संजय फेगडे, वैभव फेगडे, भगवान फेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजन व्यवस्थेचे आयोजन करण्यात आले होते. लहानग्यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.


No comments