टाकेहर्ष ग्रामपंचायत कार्यालयावर ध्वजारोहण न केल्याने ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाईची मागणी जयवंत हागोटे त्रंबकेश्वर (संपादक -:- हेमका...
टाकेहर्ष ग्रामपंचायत कार्यालयावर ध्वजारोहण न केल्याने ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाईची मागणी
जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
प्रत्येक वर्षी २६ जानेवारीला संपूर्ण भारतामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा थाटामाटात साजरा केला जातो. २६ जानेवारीला सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये मोठ्या जल्लोषात हा दिवस साजरा केला जातो.
26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आणली गेली. यामुळेच भारताला लोकशाही मिळाली. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात प्रजासत्ताक होण्याचा पहिला वर्धापनदिन 26 जानेवारी 1951 साली करण्यात आला. यावर्षी म्हणजेच 2026 मध्ये भारतीय राज्यघटना स्वीकारल्याला 77 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्ष ग्रामपंचायत कार्यालय येथे 26 जानेवारीला ध्वजारोहण करण्यात आले नाही 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन किंवा 15 ऑगस्ट स्वातंत्र दिन या राष्ट्रीय सणाच्या शासकीय कार्यालयावर राष्ट्रीय ध्वज न फडकवणे हा राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक अधिनियम 1971 (prevention of Institute to national Honours Act 1971) अंतर्गत दंडनीय गुन्हा गुन्हा दाखल करण्यात यावा व सदर ग्रामसेवकाला तात्काळ निलंबित करण्यात यावे व गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे असे भारतीय जनता पार्टीचे उत्तम लिलके व श्रमजीवी संघटनांचे पदाधिकारी व गावकरी यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे कारवाईची मागणी करण्यात आली आहे जर ग्रामसेवकावर कारवाई झाली नाही तर पंचायत समिती त्रंबकेश्वर कार्यालय येथे उपोषणाला बसू असा इशारा देण्यात आला आहे.
प्रतिक्रिया
,,दिलेल्या निवेदनाची चौकशी करून संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करण्यात येईल.
रविकांत सानप गटविकास अधिकारी त्रंबकेश्वर
,,ग्रामपंचायत कार्यालय टाकेहर्ष येथे ध्वजारोहण करण्यासाठी खांब नसल्यामुळे झेंडा फडकवण्यात आला नाही
तुषार राजपूत ग्रामसेवक टाकेहर्ष

No comments