adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उमाशंकर कस्तुरे माजलगांव शहर पोलिस ठाणेचे नवे पोलीस निरीक्षक तर पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळकरांना तात्काळ नियंत्रण कक्षात!

 उमाशंकर कस्तुरे माजलगांव शहर पोलिस ठाणेचे नवे पोलीस निरीक्षक तर पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळकरांना तात्काळ नियंत्रण कक्षात!   संभाजी पुरीगो...

 उमाशंकर कस्तुरे माजलगांव शहर पोलिस ठाणेचे नवे पोलीस निरीक्षक तर पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळकरांना तात्काळ नियंत्रण कक्षात! 


 संभाजी पुरीगोसावी (बीड जिल्हा) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

वाळूची वाहने सुरळीत चालू देण्यासाठी दरमहा 20 हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या माजलगांव शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अमोल कदम यांनी तक्रारदारांकडे वाळू वाहतूक सुरळीत राहण्यासाठी दरमहा 20 हजार रुपयांची मागणी केली आणि त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली या प्रकरणात पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी तातडीने कठोर पाऊल उचलत शहर पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांची तत्काळ नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली आहे. तडकाफडकी बदलीचे आदेश या लाचखोरींच्या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मिलन झाल्याचे पाहत पोलीस अधीक्षकांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार माजलगांव शहर पोलीस ठाण्यातून पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी केली आहे. तर त्यांच्या जागेवर नियंत्रण कक्षाकडील कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्याकडे माजलगांव शहर पोलीस ठाण्याचा नवीन पदभार सोपविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या  इंट्रीमुळे माजलगांव शहर पोलीस ठाण्याला आता खमक्या अधिकारी मिळाल्याचे जनतेंतून बोलले जात आहे.

No comments