adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिवनी–तालसवाडा रोडवरील ऑटोचालकाचा खून अनैतिक संबंधातून .... पत्नीच्या फिर्यादीवरून खून व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल; एकास अटक तिन दिवसांची पोलीस कोठडी

  शिवनी–तालसवाडा रोडवरील ऑटोचालकाचा खून अनैतिक संबंधातून .... पत्नीच्या फिर्यादीवरून खून व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल; एकास अटक तिन दि...

 शिवनी–तालसवाडा रोडवरील ऑटोचालकाचा खून अनैतिक संबंधातून ....

पत्नीच्या फिर्यादीवरून खून व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल; एकास अटक तिन दिवसांची पोलीस कोठडी  


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापुर:- शिवनी ते तालसवाडा रोडवर आढळून आलेल्या ऑटोचालकाच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, हा खुन अनैतिक संबंधातून गळा आवळून केलेला असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मृतकाची पत्नी यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून पोलीस स्टेशन MIDC दसरखेड येथे अप.क्र. 03/2026, कलम 103(1), 238(ब) BNS-2023 अंतर्गत खून करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपी अटकेत आहे.

या प्रकरणातील मृतकाचे नाव अमोल भाऊराव भवरे (वय 35, रा. धरणगाव, ता. मलकापूर) असे असून, फिर्यादी शितल अमोल भवरे (वय 32) यांनी आपल्या पतीचा खून झाल्याची तक्रार दिली आहे. आरोपीचे नाव दिनेश गणेश तायडे (रा. शिवनी, ता. मलकापूर) असे आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, दि. 07 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.35 वाजता आरोपी दिनेश तायडे याने मोबाईलवरून अमोल भवरे यांना फोन केला. फोनवर दोघांमध्ये वाद झाला असून त्यानंतर अमोल भवरे हे रागाच्या भरात घरातून “दिनेशचा फोन आला आहे, मी शेताकडे जातो” असे सांगून स्वतःची ऑटो रिक्षा घेऊन निघून गेले. मात्र ते त्या रात्री घरी परतले नाहीत.

दि. 08 जानेवारी 2026 रोजी सकाळी शिवनी–तालसवाडा रोडवर अमोल भवरे यांचे मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या गळ्यावर गळा आवळल्याच्या काळ्या खुणा, नाक-तोंडातून रक्तस्राव, तसेच हातावर व तोंडावर खरचटल्याच्या जखमा आढळून आल्या. त्यामुळे हा खून असल्याचा संशय बळावला.

फिर्यादीने आपल्या तक्रारीत असा आरोप केला आहे की, आरोपी दिनेश तायडे याने फोन करून अमोल भवरे यांना शेतात बोलावून घेतले व तेथे गळा आवळून खून केला, तसेच मृतकाचा मोबाईल फोन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने फेकून दिला.

या घटनेपूर्वी सदर मृत्यू प्रकरणात मर्ग क्र. 01/2026, कलम 194 BNSS अन्वये नोंद करून मृतकावर पोस्टमार्टम करण्यात आले होते. मात्र, पत्नीने दिलेल्या सविस्तर लेखी फिर्यादीवरून सदर मर्गचे रूपांतर खून व पुरावा नष्ट केल्याच्या गुन्ह्यात करण्यात आले आहे.

या गुन्ह्यात आरोपी दिनेश गणेश तायडे यास अटक करण्यात आली असून आज त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दि.12 जानेवारी 26 पर्यंत तिन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास स.पो.नि. नरेंद्र पेंदोर (पो. स्टे. MIDC मलकापूर) करीत आहेत. मृतकावर अंतिम संस्कार करण्यात आले असून, या प्रकरणात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोस्टमार्टमचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर घटनेबाबत अधिक स्पष्ट माहिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

No comments