adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अकोला जिल्ह्यातील वीर जवान वैभव लहाने यांना जड अंतःकरणाने शासकीय मानवंदना देवून अखेरचा निरोप, कुटुंबांचा आक्रोंश तर उपस्थितांचे डोळे पाणावले !

 अकोला जिल्ह्यातील वीर जवान वैभव लहाने यांना जड अंतःकरणाने शासकीय मानवंदना देवून अखेरचा निरोप, कुटुंबांचा आक्रोंश तर उपस्थितांचे डोळे पाणावल...

 अकोला जिल्ह्यातील वीर जवान वैभव लहाने यांना जड अंतःकरणाने शासकीय मानवंदना देवून अखेरचा निरोप, कुटुंबांचा आक्रोंश तर उपस्थितांचे डोळे पाणावले !  


सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (अकोला जिल्हा) प्रतिनिधी.‌

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 देशाच्या सीमेवर  सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असताना अकोला जिल्ह्यांतील जवान नायक वैभव श्रीकृष्ण लहाने यांना जम्मू-काश्मीर कुपवाडा सेक्टरमध्ये वीरमरण आले आहे.12 मराठा इन्फंट्रीतील  या शूरवीर जवानाला अकोला जिल्ह्याने जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. (मेसचे डबे देवुन आईने  वैभवचे शिक्षण पूर्ण केले होते.) वैभव लहाने यांचे बारावीपर्यंत शिक्षण कपिलेश्वर वडद आणि अकोला येथे पूर्ण झाले होते. गावात त्याचे छोटे छोटेखानी घर आणि एक एकर शेती आहे. वैभव चे बालपण हे त्याच्या मामाच्या गावी गेले होते. त्याच्या पश्चांत आई-वडील बहिण भाऊ असा परिवार आहे. तर त्याचा लहान भाऊ गौरव लहाने भारतीय देशसेवेत कार्यरत आहे.

अकोला जिल्ह्यातील  देशसेवेत कर्तव्यावर असताना अकोला जिल्ह्यातील सुपुत्र वीर जवान नायक वैभव श्रीकृष्ण लहाने यांना वीरमरण आले. दि. ७ जानेवारी २०२६ रोजी ते शहीद झाले. त्यांचे मूळगांव कपिलेश्वर (पो. वडद, ता. अकोला) असून, त्यांचे पार्थिंव ९ जानेवारी रोजी दु. १ पर्यंत कपिलेश्वर येथे पोहोचेल. शासकीय मानवंदना देवुन जवान वैभव लहाने यांना जड अंतःकरणाने अखेरचा निरोप देण्यात आला. सजवलेल्या रथातून वीर जवान वैभव लहाने यांची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी पोलीस महसूल प्रशासनातील अधिकारी तसेच कपिलेश्वर गावातील आजूबाजूच्या परिसरांतील आजी-माजी तसेच सर्व ग्रामस्थ शालेय विद्यार्थी यांची बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम अमर रहे वैभव लहाने अमर रहे! अशा जड अंतःकरणाने घोषणानी परिसर शोक वातावरणात दुमदुमून गेला होता. यावेळी शासकीय मानवंदना देताना लहाने कुटुंबाचा मोठा आक्रोश निर्माण झाला यावेळी उपस्थितांनाही अश्रूं अनावर झाले,

No comments