adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा येथे शोक सभेचे आयोजन व तालुका कार्यकारणी जाहीर

चोपडा येथे शोक सभेचे आयोजन व तालुका कार्यकारणी जाहीर  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा-येथे दि. 25/12/2025 रोजी स.11 वा. प...

चोपडा येथे शोक सभेचे आयोजन व तालुका कार्यकारणी जाहीर 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा-येथे दि. 25/12/2025 रोजी स.11 वा. पक्ष कार्यालयावर कॉ. अमृतराव महाजन यांची जाहीर शोक सभा घेण्यात आली शोक सभेचे अध्यक्षस्थानी कॉ. ज्ञानेश्वर पाटील (जि-सचिव) हे होते तसेच शोक सभेसाठी आलेले प्रमुख वक्ते कॉ हिरालाल परदेशी (राज्य कौन्सल सदस्य) यांनी आपलं मनोगत व्यक्त केले कॉ. अमृतराव महाजन यांचा लढा म्हणजे गोरगरिब जनतेला, शेत मजुरांना न्याय मिळवून देणारा व ग्राम पंचायत कर्मचारी संघटना, अंगणवाडी युनियन असो वा  संघटना असो त्यांचे काम प्रामाणिक व संघर्ष करून न्याय मिळवून देणारा एक कर्तबगार नेता हरपला अशा लढवय्या नेत्याला लाल सलाम व त्यांचे अपुर्ण काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सर्व कॉम्रेड करतील असे मनोगत व्यक्त केले.

तसेच शोक सभेचा कार्यक्रम संपल्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष चोपडा तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात झाली त्यात काँ. बाळू लोहार,यांची तालुका सचिवपदी एक मताने निवड करण्यात आली व पुढील अकरा सदस्यांची कार्यकारणी नियुक्ती करण्यात आली. त्यात काँ गोरख वानखेडे जॉ. सचिव, कॉ नानाभाऊ पाटील ता जाँ सचिव, कॉ. वासुदेव कोळी-ता-सहसचिव, कॉ. ममताताई महाजन (महिला कार्यकत्या) कॉ.लेलीन महाजन यांची नियुक्ती करण्यात आली.

No comments