यावल महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व युवती सभा अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन. भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव ...
यावल महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व युवती सभा अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन.
भरत कोळी यावल ता.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे सांस्कृतिक विभाग व युवती सभा विभाग यांच्या वतीने प्राचार्या डॉ संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपप्राचार्य प्रा एम डी खैरनार तसेच उपप्राचार्य डॉ एच जी भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, पत्रलेखन स्पर्धा, पारंपारिक वेशभूषा स्पर्धा आणि साडी वेशभूषा स्पर्धांचे यशस्वी आयोजन संपन्न झाले.
रांगोळी स्पर्धेचे परिक्षण प्रा एन ए पाटील व प्रा रुपाली शिरसाठ यांनी केले
मेहंदी स्पर्धेसाठी प्रा एन ए पाटील व प्रा डॉ वैशाली कोष्टी यांनी
पारंपरिक वेशभूषा तसेच साडी वेशभूषा स्पर्धेसाठी प्रा रामेश्र्वर निंबाळकर व प्रा रुपाली शिरसाठ यांनी परिक्षण केले तर पत्रलेखन स्पर्धेसाठी प्रा हेमंत पाटील व यांनी परिक्षण केले
स्पर्धा यशस्वीतेसाठी युवती सभेच्या प्रा प्रतिभा रावते, प्रा सोनाली पाटील यांनी तसेच सांस्कृतिक विभागाचे प्रा रत्नाकर कोळी यांनी परिश्रम घेतले..
या प्रसंगी प्रा एस. आर. गायकवाड, प्रा. आर. डी. पवार, प्रा भागवत पाटील,प्रा पी व्ही पावरा प्रा सी टी वसावे, प्रा संतोष जाधव, प्रा प्रशांत मोरे, प्रा नागेश्वर जगताप, प्रा अर्जुन गाढे,प्रा. अक्षय सपकाळे तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते...

No comments