यावल तालुक्यातील आदिवासी कोळी जमातीने आ. जावळे यांचे मानले आभार भरत कोळी यावल ता.प्र (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : नुकत्याच पार प...
यावल तालुक्यातील आदिवासी कोळी जमातीने आ. जावळे यांचे मानले आभार
भरत कोळी यावल ता.प्र
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत फैजपुर नगरपालिका निवडणुकीत उपनगराध्यक्ष व यावल नगरपालिकेत नगरसेविका आदिवासी कोळी समाजाला प्रतिनिधीत्व करण्यासाठी संधी दिल्याने आ. अमोल हरीभाऊ जावळे यांचे आदिवासी कोळी जमातीच्या वतीने आभार मानून सत्कार करण्यात आला. यावल नगरपालिकेत भाजपा कडून सविता नन्नवरे व फैजपुर नगरपालिका निवडणुकीत कु. निकीता कोळी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष निवड झाल्या बद्दल यावल तालुक्यातील आदिवासी कोळी जमातीचा समाज बांधवानी रावेर- यावल विधानसभा मतदारसंघातील आ. अमोल हरीभाऊ जावळे यांच्या निवासस्थानी १५ जानेवारी रोजी आभार मानुन आ. अमोलभाऊ जावळे यांचे आभार मानुन सत्कार केला. राज्यात कमी वयात शिक्षणाबरोबर समाजसेवा करण्यांची संधी फैजपुर नगरपालिका निवडणुकीत निवडुन आलेल्या उपनगराध्यक्ष निकीता प्रकाश कोळी या एकमेव उपनगराध्यक्ष आहे. आदिवासी कोळी जमातीचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली यावल तालुक्यातील फैजपुर येथील प्रकाश कोळी,भालोद सरपंच प्रदिप कोळी, रिधुरी येथील नंदुभाऊ सोनवणे, वढोदा येथील संदिप सोनवणे, यावल येथील मुकेश कोळी, जालंधर कोळी, पिंप्री येथील रोहीदास कोळी ,पाडळसा येथील कीरण तायडे, प्रमोद सोनवणे, दुसखेडा सुभाष सोनवणे, कासवे शिवा शेठ, कठोरा भिमाभाऊ कोळी, कैलास सपकाळे सरपंच, अंजाळे, नितीन सपकाळे, धनराज कोळी, बोरावल येथील नानाभाऊ कोळी, निमगाव सोनु तावडे, कोळवद विठ्ठल सुर्यवंशी संजय सुर्यवंशी, कठोरा येथील अकुंश महाराज, सांगवी पंकज कोळी, पिपरूळ मुकेश कोळी सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments