ज्योती विद्या मंदिर, सांगवी बु!! येथे रेड रिबन क्लबतर्फे पोस्टर व रांगोळी स्पर्धा तालुका प्रतिनिधी:- राहुल जयकर (संपादक -:- हेमकांत गायकव...
ज्योती विद्या मंदिर, सांगवी बु!! येथे रेड रिबन क्लबतर्फे पोस्टर व रांगोळी स्पर्धा
तालुका प्रतिनिधी:- राहुल जयकर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ज्योती विद्या मंदिर, सांगवी बुद्रुक येथे रेड रिबन क्लब व ग्रामीण रुग्णालय, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने NCC कॅडेट्ससाठी एड्स जनजागृतीपर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांच्या अनुषंगाने पोस्टर व रांगोळी स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या.
या कार्यक्रमासाठी आय.सी.टी.सी. समुपदेशक श्री. वसंत संदानशिव व RKSK समुपदेशक श्री. पवन जगताप यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेत सहभागी NCC कॅडेट्सनी आपल्या कलेच्या माध्यमातून एड्स आजाराबाबत घ्यावयाची खबरदारी, आवश्यक दक्षता तसेच या आजारामागील कारणे प्रभावीपणे मांडली.
कार्यक्रमप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. एम. भंगाळे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. तसेच NCC अधिकारी श्री. पी. एम. भंगाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निरोगी शरीर व जागरूकतेचे महत्त्व विशद केले.
रांगोळी स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे :
प्रथम – सानिया तडवी
द्वितीय – ज्ञानेश चौधरी
तृतीय – हिमांशू येवले
पोस्टर स्पर्धेचे निकाल :
प्रथम – हिमेक्षा कोळी
द्वितीय – राजनंदिनी बाणाईत
तृतीय – नेहा चौधरी
या स्पर्धांचे परीक्षण श्रीमती रेखा साळूंके मॅडम व श्री. रवींद्र वायकोळे सर यांनी केले. विजेत्या तसेच सहभागी NCC कॅडेट्सचे अभिनंदन मुख्याध्यापक श्री. आर. एम. भंगाळे यांनी केले. यावेळी श्री. सी. पी. फिरके उपस्थित होते.
सर्व विजेत्या कॅडेट्सना ट्रॉफी व प्रमाणपत्र, तर सहभागी कॅडेट्सना सहभाग प्रमाणपत्र रेड रिबन क्लबच्या वतीने प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

No comments