🟡 अंतुर्ली ग्रामपंचायतीत हिंदू हृदयसम्राट, सरसेनापती स्व. बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी 🟡 किरण धायले मुक्ताईनगर (स...
🟡 अंतुर्ली ग्रामपंचायतीत हिंदू हृदयसम्राट, सरसेनापती स्व. बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी 🟡
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अंतुर्ली ता. मुक्ताईनगर येथील ग्रामपंचायत कार्यालयात हिंदू हृदयसम्राट, सरसेनापती स्व. बाळासाहेब ठाकरे व आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते हिंदू हृदयसम्राट, सरसेनापती स्व. बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी दोन्ही महान नेत्यांच्या विचारांवर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याचा आदर्श नव्या पिढीने आत्मसात करावा, असे मत व्यक्त केले. कार्यक्रम शांततामय व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

No comments