adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एलसीबीची धडाकेबाज कारवाई.. कोठेवाडी खुनातील आरोपीकडून १२ जबरी चोरीचे गुन्हे उघड

 एलसीबीची धडाकेबाज कारवाई.. कोठेवाडी खुनातील आरोपीकडून १२ जबरी चोरीचे गुन्हे उघड सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यान...

 एलसीबीची धडाकेबाज कारवाई.. कोठेवाडी खुनातील आरोपीकडून १२ जबरी चोरीचे गुन्हे उघड


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-कोठेवाडी खुन प्रकरणातील आरोपी व त्यांच्या साथीदारांकडुन चोरीचे 12 गुन्हे उघडकीस आणुन 8,02,400/-रु कि.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.बातमीची हकीगत अशी की, दिनांक 15/01/2026 रोजी रोजी रात्रीचे 02/00 वा.चे सुमारास फिर्यादी यांची मुलगी व सवत असे घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यानी जबरदस्तीने घराचा दरवाजा तोडुन आतमध्ये प्रवेश करुन चाकुचा धाक दाखवुन सोन्याचे दागिणे व रोख रक्कम चोरुन नेले आहे. सदर घटनेबाबत फिर्यादी श्रीमती विमल बबन ढाकणे रा. ढाकणेवस्ती, शेवगाव जि. अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगाव पोलीस ठाणे गु.र.नं. 29/2026 बी. एन. एस. 2023 चे कलम 309 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर शहरामध्ये जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे करणारे आरोपींची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते. सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक हरिष भोये,अंमलदार दिपक घाटकर,बिरप्पा करमल, फुरकान शेख,बाळासाहेब नागरगोजे,सोमनाथ झांबरे, भिमराज खर्से,बाळासाहेब खेडकर,किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे,अमोल कोतकर,अमृत आढाव,प्रशांत राठोड,महिला भाग्यश्री भिटे, वंदना मोडवे,चालक चंद्रकांत कुसळकर,उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार करुन सदर पथकास घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना करण्यात आले होते.   

नमुद पथकाने गुन्ह्यातील आरोपींबाबत गोपनिय माहिती व व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती संकलित करुन आरोपीचे शोध घेत असतांना दिनांक 17/01/2026 रोजी पथकास सदरचा गुन्हा आरोपी नामे रोहित नादर चव्हाण हा त्याचे साथीदारास केला असुन तो बाराबाभळी ते चंदबीबी महल परिसरात येथे येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने बाराबाभळी ते चंदबीबी महल परिसरात जावुन खात्री करता सदर ठिकाणी काही इसम संशयीत रित्या दिसुन आले. तेव्हा पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांचे नांव 1) रोहीत नादर चव्हाण वय- 26 वर्षे  रा.चिचोंडी पाटील ता.जि. अहिल्यानगर, 2) बंटी टाबर चव्हाण वय- 27 वर्षे रा. म्हरोळा ता पैठण जि.छत्रपती संभाजीनगर, 3) करण शिरसाठ भोसले वय- 22 वर्षे रा. पिंपळवाडी, ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर, 4) अज्ञान उर्फ राजु उर्फ सक्या वकील्या भोसल्या वय -50 वर्षे रा. पिंपळवाडी ता. गंगापुर जि.छत्रपती संभाजीनगर, 5) विशाल टाबर चव्हाण रा. म्हरोळा ता पैठण जि.छत्रपती संभाजीनगर (फरार) असे असल्याचे सांगीतले आहे.   

त्यानंतर ताब्यातील आरोपीचे ताब्यातुन व आरोपीचे सांगणे प्रमाणे 7,02,000/- रु कि.चे 54 ग्रॅम वजानाचे सोन्याचे दागिणे व सोन्याचे लगड, 500/-रु कि.ची पाना व लोखंडी कटावणी, 1,00,000/- रु कि.ची मोटार सायकल असा एकुण 8,02,400/- रु कि.चा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपी नामे रोहीत नादर चव्हाण हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचे विरुध्दविविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.ताब्यातील आरोपी  मुद्देमालासह शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील शेवगाव पोलीस स्टेशन करीत आहे.आरोपी नामे अज्ञान उर्फ राजु उर्फ सक्या वकील्या भोसल्या हा कोठेवाडी खुनाच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगुन आल्यानंतर त्याचे वरील साथीदासह गुन्हा केलेला आहे

सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments