adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तिरट जुगार क्लब उध्वस्त..ऑनलाईन बिंगो अड्ड्यावर ही एलसीबीची धडक कारवाई ९ आरोपी ताब्यात

  तिरट जुगार क्लब उध्वस्त..ऑनलाईन बिंगो अड्ड्यावर ही एलसीबीची धडक कारवाई ९ आरोपी ताब्यात   सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड...

 तिरट जुगार क्लब उध्वस्त..ऑनलाईन बिंगो अड्ड्यावर ही एलसीबीची धडक कारवाई ९ आरोपी ताब्यात  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत अहिल्यानगर तालुका हद्दीतील तिरट जुगार क्लब व ऑनलाईन बिंगो अड्यावर छापा टाकला. या कारवाईत ९ आरोपींना ताब्यात घेत तब्बल २,०१,३६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, दीपक घाटकर, विजय पवार, राहुल द्वारके, भिमराज खर्से व आकाश काळे यांचे पथक अवैध धंद्यांबाबत माहिती काढून कारवाईसाठी नियुक्त करण्यात आले होते.दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना, नगर–दौंड रोडवरील जय मल्हार गॅरेजजवळ, अरणगाव येथे काही इसम ‘तिरट’ नावाचा हार-जीतीचा पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत व खेळवित असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता, एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याचे आढळून आले.

छाप्यात तिरट जुगार खेळताना मिळून आलेल्या इसमांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

१) धिरज राजेंद्र संदलसे (वय ३३), २) नासीर गुलाब खान (वय ५८), ३) महेंद्र शिवानंद भांबळे (वय ३३), ४) रामदास एकनाथ थोरे (वय ७०), ५) ज्ञानेश्वर धनराज गिरवले (वय ४८), ६) संजय बाळासाहेब रासकर (वय ५०), ७) पोपट मुरलीधर पवार (वय ५८) — सर्व रा. अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध भागातील रहिवासी आहेत.

पंचासमक्ष अंगझडती घेतली असता आरोपींकडून १२,३६० रुपये रोख रक्कम व १,८२,२६० रुपये किमतीचे सहा मोबाईल फोन, असा एकूण १,९४,६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन गु.र. नं. ७७/२०२६ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.

याच कारवाईदरम्यान पथकाला याच परिसरात ‘बिंगो’ नावाचा हार-जीतीचा जुगार खेळवला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गणेश बाबासाहेब घुले (वय २२, रा. लोंढे मळा, केडगाव) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून बिंगो जुगारासाठी लागणारे साहित्य व रोख रक्कम असा ६,७४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे गु.र. नं. २८/२०२६ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या संयुक्त कारवाईत तिरट जुगार क्लब व ऑनलाईन बिंगो अड्यावर छापा टाकून एकूण २,०१,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यापुढेही जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर सातत्याने कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या सूचनांनुसार व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली.

No comments