adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डॉ.अमृताताई सोनवणे यांचा नेतृत्वाला नागरिकांचा भरीव पाठिंबा ...

 डॉ.अमृताताई सोनवणे यांचा नेतृत्वाला नागरिकांचा भरीव पाठिंबा ...               विकास ही एक निरंतर प्रक्रिया आहे.जे विकास कार्य काल बाकी होते...

 डॉ.अमृताताई सोनवणे यांचा नेतृत्वाला नागरिकांचा भरीव पाठिंबा ...


              विकास ही एक निरंतर प्रक्रिया आहे.जे विकास कार्य काल बाकी होते ते आज करावं लागेल आणि जे विकास कार्य आज झाले तर उद्या गरजेनुसार दुसरे विकास कार्य करावे लागेल.पण त्यासाठीही विकासाला काळानुसार उजाळा देण्यासाठी आणि विकासाचा पाया दिवसेंदिवस मजबूत करण्यासाठी गरज असते एका मजबूत नेतृत्वाची...आणि नेतृत्व म्हणजे केवळ आदेश देण नाही तर निर्णय क्षमतेने जनतेच्या समस्या ओळखून जनतेला विकासाचा मार्गावर घेवून जाण्याची योग्य कला आहे.योग्य नेतृत्व निर्णयक्षमता, वचनबद्धता, दुरदृष्टी, प्रेरणा, प्रामाणिकपणा आणि संवेदनशिलपणा या सहा गुणांनी निर्माण होतं. सामाजिक बांधिलकीचे हे सहाही गुण डॉ.अमृताताई सोनवणे यांना वारसा स्वरूपात त्यांचा पारिवाराकडूनच लाभले आहे. म्हणून महानगरपालिका निवडनुकीचा प्रचारा दरम्यान त्यांना ठिकठिकाणी उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.


        डॉ.अमृताताई सोनवणे यांना राजकीय व सामाजिक वारसा परिवारातूनच लाभले आहे अशी जळगावच्या विकासासंदर्भात  प्रसारमाध्यमांद्वारे चर्चा करताना अनेक वेळा उल्लेख होताना दिसते. आणि हे सत्य देखील आहे.परंतु हे अर्धसत्य आहे.

कारण त्याच परिवाराकडून, मग ते बाबा असोत आई-वडिल असोत की काका या संपूर्ण परिवाराकडून डॉ.अमृताताई सोनवणे यांना वैचारिक वारसा, संघर्षाचा वारसा, त्यागाचा वारसा, संघटन कौशल्याचा वारसा, प्रामाणिकपणाचा वारसा,सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा वारसा,जनतेचा विकासाचा वारसादेखील लाभला आहे.आणि याची जाणिव प्रभागा क्र. ११ सोबत संपूर्ण जळगावकरांमध्ये प्रकर्षाने जाणवते...

            कारण नेतृत्वाची खरी सुरूवात घरातूनच सुरू होते.आपले आई-वडिल हेच आपले पहिले नेते असतात.जे न बोलता शिकवतात न दाखवता प्रेरणा देतात त्यांच्या कृतीतूनच एक आदर्श उदाहरणाची निर्मिती करतात.यासोबत आई-वडिलांकडून शिकलेलं नेतृत्व हे सर्वांत मौल्यवान, अनुभवावर आधारित आणि मुल्यांवर आधारित नेतृत्व असतं. हे नेतृत्व फक्त सत्ता आणि प्रसिद्धीमुळेच नाहीतर प्रेम, जबाबदारी, योग्य निर्णय, आणि निस्वार्थ भावनेतून परिवाराचा सेवेची परंपरेला पुढे नेण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतं. डॉ.अमृताताई सोनवणे परिवाराचा याच सेवेची आणि विकासाची परंपरेला निरंतर पुढे नेतील अशी राजकीय वर्तृळा पाठोपाठ जनसामान्यांमध्ये विश्वास दिसत आहे. म्हणूनच प्रभाग क्र.११ मधून शिवसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार म्हणून समवयस्कांसोबत प्रौढ नागरिकांचा स्नेहाचा, आपुलकीचा आणि आशिर्वादाचा रूपाने  डॉ.अमृताताई सोनवणे यांना भरीव पाठिंबा दिसत आहे.

               महानगरपालिका ही नागरी प्रशासन व्यवस्थेतील सर्वोच्च पातळीवरील रचना आहे. याठिकाणी शहराच्या विविध समस्यांवर चर्चा करणे, महापालिकेचा अंदाजपत्राचा मान्यतेविषयी योग्य निर्णय, आवश्यकतेप्रमाणे उपविधी (by Laws) तयार करणेे,हशहराच्या सांस्कृतिक व इतर महत्वाचा क्षेत्रांशी संबंधित निर्णय घेण्याची क्षमता असणे महत्वाचे मानले जाते. डॉ.अमृताताई सोनवणे या उच्चशिक्षित असून प्रभागातील समस्यांची सखोल माहिती घेवून उत्तम संवाद कौशल्याने धोरण ठरवून त्यांच्यामार्फत समस्या सोडवण्यासाठी लवकर मदत होईल अशी सर्वसामान्य नागरिकांमध्ये वार्तालाभ होताना दिसत आहे.

            डॉ.अमृताताई सोनवणे  यांची आमदार कन्या म्हणून जमेची बाजू असली तरी कुटुंबाचा वारसा जपत त्या स्वतःही अनेक सामाजिक कार्यांमध्ये सक्रीय आहेत.त्यांनी वैद्यकिय सेवेसोबत शिक्षण आणि क्रिडा क्षेत्रातही भरीव योगदान आहे.डॉ.अमृताताई सोनवणे यांनी पतीसोबत त्यांच्या रूग्णालयाचा माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी तर गरजूंसाठी अनेकवेळा आवश्यक साहित्यांचे वाटप केले आहे.त्यांचे हे कार्य सामाजिक बांधिलकी जोपासणारे तर आहेच त्यांची ही संवेदशिलता  सशक्त नेतृत्वाकडे वाटचाल करेल असा विश्वास प्रभागातील नागरिकांपाठोपाठ जळगावकरांमध्ये दिसत आहे.आणि हे डॉ.अमृताई सोनवणे यांना प्रभाग क्र.११ मधील नागरिकांनी दिलेल्या भरीव समर्थनामुळे जाणवते.


                प्रकाश क्षीरसागर

                 (राजकीय  विश्लेषक)

No comments