यावल येथे भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज सालाबादप्रमाणे सृष्टीचे रचनाकार व कामगारांचे...
यावल येथे भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज सालाबादप्रमाणे सृष्टीचे रचनाकार व कामगारांचे दैवत असलेल्या भगवान विश्वकर्मा यांची जयंती यावल शहरात मोठ्या श्रद्धेने साजरी करण्यात आली. यावल शहरातील फालक नगरजवळ असलेल्या भगवान विश्वकर्मा चौकातील फलकाचे पूजन व पुष्पहार अर्पण करून जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी चौकातील भगवान विश्वकर्मा फलकास पुष्पहार घालून विधीवत पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष चेतन आढळकर, नगरसेवक उमेश फेगडे यांच्यासह राकेश कोलते, रोशन येवले, दिलीप वाणी, सुरेश आढळकर, दिलीप आढळकर, राजू आढळकर, संतोष आढळकर, सुभाष दांडेकर, रघु आढळकर, किशोर निवतकर, गोविंदा आढळकर, भैय्या आढळकर, पप्पू आढळकर, चरण आढळकर, उज्वल कानडे, भूषण फेगडे, कोमल इंगळे, सोहन कोळंबे, नितीन बारी आदी समाज बांधव व युवा पदाधिकारी उपस्थित होते. भगवान विश्वकर्मा हे श्रम, कौशल्य आणि सृजनशीलतेचे प्रतीक असून त्यांच्या जयंतीनिमित्त समाजातील एकोप्याचे दर्शन घडले. कार्यक्रम शांततेत व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

No comments