यावल येथे नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) श्री जीवा महाले नाभिक बहुउद्देशीय संस्था, यावल यां...
यावल येथे नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्री जीवा महाले नाभिक बहुउद्देशीय संस्था, यावल यांच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या यावल नगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास नगराध्यक्षा आदरणीय छायाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी उपनगराध्यक्ष, गटनेते, उपगटनेते तसेच सर्व नवनिर्वाचित व स्वीकृत नगरसेवकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. चाळीसगाव येथील नाभिक समाजाचे नगरसेवक अभय वाघ तसेच मुक्ताईनगर येथील नगरसेवक प्रशांत टोंगे यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पूर्व विभागीय जिल्हाध्यक्ष मा. सचिन सोनवणे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. संजय बोरसे, पंडित सनान्से, प्रशांत बानाईत, गणेश सोनवणे व मा. शिवाजी बहाळकर उपस्थित होते.
कार्यक्रमप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक मा. पी. एस. सोनवणे सर यांनी यावल नाभिक समाजाच्या सामाजिक कार्यासाठी व समाज मंदिराच्या उभारणीसाठी ₹५,००१/- ची देणगी देत समाजप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.
यावेळी मा. अतुल पाटील, मा. उमेश फेंगडे, मा. सागर चौधरी, मा. पी. एस. सोनवणे सर, निलेश बारी, विजय नन्नावरे सर आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून नाभिक समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष मा. अनिल चौधरी यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. नरेंद्र महाले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल शहरातील नाभिक समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.
अध्यक्षीय भाषणात मा. सचिन सोनवणे यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेवकांनी नाभिक समाजाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. या समारंभास यावल शहरासह जळगाव, चाळीसगाव, मुक्ताईनगर व भुसावळ येथील नाभिक समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच हा सत्कार समारंभ सामाजिक ऐक्य, सन्मान आणि संघटन शक्तीचे दर्शन घडवणारा ठरला.

No comments