यावल येथील जे. टी. महाजन स्कूलमध्ये महिला पालकांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल :...
यावल येथील जे. टी. महाजन स्कूलमध्ये महिला पालकांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी यावल येथील जे. टी. महाजन शिक्षण मंडळ संचलित जे. टी. महाजन स्कूलमध्ये मकर संक्रांतीनिमित्त महिला पालकांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या सौ. रंजना महाजन मॅडम उपस्थित होत्या. यावेळी इंग्लिश माध्यमाच्या प्राचार्या सौ. दिपाली धांडे मॅडम यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सौ. आरतीताई शरद महाजन (माजी जिल्हा परिषद सदस्या), शा. ल. खडके माध्यमिक शाळेच्या शिक्षिका सौ. स्वाती धनंजय फिरके, तसेच सौ. नीलिमा संजय महाजन, सौ. नीलिमा नितीन महाजन व सौ. सुरेखा देविदास महाजन उपस्थित होत्या.
हळदीकुंकू कार्यक्रमात संगीत खुर्ची, लपलेली वस्तू शोधणे यांसारखे विविध मनोरंजक खेळ घेण्यात आले. या खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत विजयी ठरलेल्या महिलांना सप्रेम भेटवस्तू स्वरूपात बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमप्रसंगी सौ. स्वाती फिरके मॅडम यांनी महिला पालकांना अनमोल मार्गदर्शन करत पालक व शाळा यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रियंका फेगडे मॅडम व सौ. कुंदा नारखेडे मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. श्रद्धा बडगुजर मॅडम यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. गौरी भिरूड मॅडम व सौ. राजश्री लोखंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आखण्यात आली.
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे हा हळदीकुंकू कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

No comments