पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या बदलीने पंढरपूरकर भावुक तर पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी स्वीकारला पदभार ! संभाजी पुरीगोसावी (सोल...
पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या बदलीने पंढरपूरकर भावुक तर पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी स्वीकारला पदभार !
संभाजी पुरीगोसावी (सोलापूर जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सोलापूर जिल्हा पोलीस दलातही हळुवार पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्याचे आदेश पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी नुकतेच काढले असून. यामध्ये सोमवारी रात्री उशिरा अकलूज करकंब आणि पंढरपूर शहर या पोलीस ठाण्यात नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचा सोलापूर जिल्ह्यात कार्यकाळ पूर्णता: झाल्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या आदेशावरून त्यांची सातारला बदली करण्यात आली आहे. विश्वजीत घोडके यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून पोलीस ठाण्याचा कायापालट चांगलाच केला होता. तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था नेहमीच अबाधित राखण्यात ते नेहमीच प्रयत्नशील दिसून आले, मात्र त्यांच्या बदलीने पंढरपूरकर हे चांगलेच भावुक झाल्याचे देखील दिसून येत आहे. त्यांच्या रिक्त जागेवर पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे हे देखील कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांना पोलीस खात्यात चांगलेच ओळखले जाते. सोमवारी रात्री उशिरा पंढरपूर शहर अकलूज करकंब या पोलीस ठाण्यांना नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पो.नि. दशरथ वाघमोडे पंढरपूर शहर पोलीस ठाणे) स.पो.नि. सागर कुंजीर (करकंब पोलीस ठाणे ते अकलूज पोलीस ठाणे) स.पो.नि. योगेश लंगुटे (अकलूज ते करकंब पोलीस ठाणे) या बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांनी आपल्या नव्या पदस्थापने ठिकाणी पदभार स्वीकारून आपला अहवाल मुख्यालयाकडे सादर केला आहे.

No comments