चोपडा नगर परिषदेच्या भाजप व राष्ट्रवादी गटाच्या गटनेतेपदी भाजपचे नगरसेवक गजेंद्र जयस्वाल यांची निवड चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ग...
चोपडा नगर परिषदेच्या भाजप व राष्ट्रवादी गटाच्या गटनेतेपदी भाजपचे नगरसेवक गजेंद्र जयस्वाल यांची निवड
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा नगर परिषदेच्या भाजप व राष्ट्रवादी गटाच्या गटनेतेपदी भाजपचे नगरसेवक गजेंद्र जयस्वाल यांची निवड झाली आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाचे ६ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २ असे एकूण ८ नगरसेवक मिळून गट स्थापन करण्यात आला. त्याची नोंदणी १२/०१/२०२६ रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली.तर भाजप,राष्ट्रवादीच्या पॅनलमध्ये असलेले जनसराज्य परिवर्तन आघाडीचे २ नगरसेवक मात्र या गटातून अलिप्त असल्याने उलटसुलट तर्कवितर्क लावण्याचे समजते.गट स्थापनेवेळी भाजप व राष्ट्रवादीचे सर्व ८ नगरसेवक जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हजर होते. गजेंद्र जयस्वाल यांच्या गटनेतेपदी निवडीचे मंत्री गिरीश महाजन,मंत्री संजय सावकारे,मंत्री रक्षा खडसे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील,रोहित निकम, राकेश पाटील,शहराध्यक्ष नरेंद्र पाटील,जीवन चौधरी यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अरुणभाई गुजराथी,चंद्र-हास गुजराथी, सुनील जैन यांनी स्वागत केले

No comments