रावेर पोलीसांची धडक कारवाई; तहसील कार्यालयातील चोरुन नेलेले दोन ट्रॅक्टरांसह दोन जण ताब्यात वाळू चोरी प्रकरणी जप्त केले होते ट्रॅक्टर! रा...
रावेर पोलीसांची धडक कारवाई; तहसील कार्यालयातील चोरुन नेलेले दोन ट्रॅक्टरांसह दोन जण ताब्यात
वाळू चोरी प्रकरणी जप्त केले होते ट्रॅक्टर!
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तहसील कार्यालय आवारातून अवैध गौण खनिज उत्खनन वाहतूक प्रकरणी महसूल प्रशासनाने जप्त केलेले दोन ट्रॅक्टर ट्रॉली सह चोरीला गेले होते हे चोरीला गेलेले दोन्ही ट्रॅक्टर सुमारे तीन लाख ३५ हजार रुपये किंमतीचे दोन ट्रॅक्टर ट्रॉली सह रावेर पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी दोन दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतचे वृत्त असे की अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९ ए एन ४४५२ व एम एच १९ पी ३४४० हे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह महसूल विभागाने रोजीजप्त केले होते. सदर ट्रॅक्टर येथील तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले होते. दि. २७ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास या आवारातून दोन जणांनी सदर ट्रॅक्टर चोरून नेले. याबाबत मंडळ अधिकारी निंभोरा रवी शंकर वानखेडे यांनी दिलेल्या
तक्रारीवरून संदीप हिरामण कोळी, महेंद्र पंजाब तायडे दोघेही राहणार सिंगनूर तालुका रावेर यांच्या विरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान रावेर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून तीन लाख ३५ हजार रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर जप्त करून दोघं संशयीतांना ताब्यात घेतले. सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्री डॉ. महेश्वर रेड्डी, अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव माननीय श्री अनिल बडगुजर एसडीपीओ फैजपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल पोलीस हवालदार ईश्वर चव्हाण तसेच पोलीस शिपाई प्रमोद पाटील सुकेश तडवी श्रीकांत चव्हाण यांनी केली आहे.

No comments