adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा तहसीलदार यांचेकडे शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी.

 चोपडा तहसीलदार यांचेकडे शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी.  चंद्रकांत पाटील विचखेडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड)     ...

 चोपडा तहसीलदार यांचेकडे शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. 


चंद्रकांत पाटील विचखेडा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

                 आज दि. 30 रोजी चोपडा तालूक्यातील शेतकरी बांधवांनी मा. तहसीलदार साहेब चोपडा यांच्याकडे निवेदन देऊन शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. या निवेदनात पिडीत शेतकऱ्यांनी जळगाव जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यात मका खरेदी केंद्र सुरू झाली आहेत. मात्र चोपडा येथील खरेदी केंद्र अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे ज्या शेतकर्यांनी शासकीय खरेदीसाठी नोंदणी केलेली आहे, त्यांच्या  मालाचे अवकाळी पावसाने व गारपिटीने नुकसान झाल्यास  चोपडा तालुक्यातील प्रशासन आणि शासन जबाबदार राहील  असे निवेदनाद्वारे कळविण्यात आले असून मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर चोपडा तालुक्यातील नागलवाडी येथील शेतकरी प्रितमसिंग हुकूमसिंग पाटील, योगेश सुरेश पाटील, वर्धमान पाटील,, राजेंद्र शंकरलाल गुजराथी, मोहन उत्तम पाटील यांच्या सह्या आहेत.

No comments