तांदलवाडी येथील नदी पत्रातून बेसुमार वाळू वाहतुक चोपडा प्रतिनिधी :- (संपादक -:- हेमकांत गायकवाड) तांदलवाडी येथील नदी पत्रातून बेसुमार व...
तांदलवाडी येथील नदी पत्रातून बेसुमार वाळू वाहतुक
चोपडा प्रतिनिधी :-
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तांदलवाडी येथील नदी पत्रातून बेसुमार वाळू वाहतूक सुरु असून शेतक-यांमध्ये चितेचे वातावरण दिसत आहे . मोठ मोठाली खड्डे त्यात असंख वाळू वाहतूक करणा-या गाड्या मुळे अक्षरशा नाल्याचे स्वरूप तापी नदीला येतांना दिसत आहे . वाचवा मला वाचवा – मी नेसलेली रंगीबेरंगी मातीने नेसलेली शालू तुम्ही का काढताहेत असे म्हणत तापी नदी शांत वाहतांना दिसते.शेवटी ती आईचं , जिला तापी आई म्हणत आपण पूजा करतो तिलाच मारण्यासाठी बहुसंख्य लोक त्याठिकाणी वाळू वाहतूक करतांना दिसत आहे. जिने माय सारखे आपल्याला वागले, अनेक लोकांनी तिच्यावर पोट भरले आज तिच्या जीवावर उठले / का आणि कशासाठी ,मूठभर पैश्यासाठी ,किती दिवस पुरतील एवढे पैसे ... विचार करा अजून वेळ गेलेली नाही....
तापी नदी पत्रातून दि ७ जानेवारी पासून होणा-या बेसुमार वाळू वाहतुकीला गावक-याचां विरोध असल्यामुळे आज श्री गोपाल धनगर ( चोसका संचालक ) यांच्या मार्ग दर्शनाखाली तापी नदीवर जावून पाहणी करण्यात आली. गट नंबर १८, १९ आणि ३१ या गटाचा लिलाव शासनामार्फत देण्यात आला आहे .या गटातून रोज शेकडो ट्राक्टर वाळू उचल आहे. तरीही गट नंबर २२ समोरून वाळू उचल होतांना दिसत आहे.गावक-यांनी ठेकेदाराला हि बाब निदर्शनास आणून दिली असता आम्ही हि वाळू उचलली नसून असे स्पष्ट केले मग वाळू कोण उचलत आहे याकडे प्रसासनाने लक्ष द्यावे.प्रशासनाकडे पत्र व्यवहार करून सुध्दा कुठलीही दखल घेण्यात नाही.वाळूवतुकीला प्रशासन मदत करते कि काय अशी नागरिकांच्या मनात शंका निर्माण होत आहे .रात्री अपरात्री जेसीबी पोकलंड ने वाळू वाहतूक होते अशी तक्रार गोपाल धनगर यांनी केली आहे.
No comments