adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर समारोप

 राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर समारोप  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सु...

 राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर समारोप 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील महाविद्यालय चोपडा येथील राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन भाऊसो. शामराव शिवराम पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चहार्डी, तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथे दिनांक 18 जानेवारी ते 24 जानेवारी या दरम्यान करण्यात आले   होते. या शिबिराच्या समारोप प्रसंगी अध्यक्ष म्हणून मा.श्री. के.डी.चौधरी सदस्य, गव्हर्निंग कौन्सिल महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा, प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. छगन नारायण पाटील सदस्य, गव्हर्निंग कौन्सिल महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. के.एन. सोनवणे, मा.श्री. चंद्रकांत लोटू पाटील पत्रकार, देशदूत व प्रा .सौ सुनंदा नन्नवरे उपस्थित होते.

     या समारोप कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेतील योगिनी बारेला या स्वयंसेविकेने एनएसएस गीत सादर केल. या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेतून सात दिवसातील केलेल्या कार्याचा आढावा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. विशाल हौसे यांनी मांडला. त्यात प्राथमिक शाळेतील केलेली स्वच्छता, सिकलसेल चाचणी, वृक्षांना केलेले रंगरंगोटी, आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण,ग्राम स्वच्छता, पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम यांचा समावेश होता. 

      राष्ट्रीय सेवा योजनेतील हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात आलेल्या विविध अनुभवांचे कथन स्वयंसेवक धनश्री गाडीलोहार, खुशी चौधरी व रोहिदास बारेला यांनी केले.या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के एन.सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले की ग्रामीण भागातील समस्या समजून घेणे, पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करणे हे स्वयंसेवकांचा आद्य कर्तव्य आहे. ग्रामीण समस्यांची जाणीव स्वयंसेवकांना व्हावी तसेच स्वच्छतेचे महत्त्व कळावे या उद्देशाने विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध कॅम्पची माहिती त्यांनी दिली.श्री.चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयाचा व संस्थेचा गुणगौरव करत विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेऊन आपला व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा असे आवाहन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित श्री. के.डी.चौधरी यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले राष्ट्रीय सेवा योजनेमधून स्वयंसेवकांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन विकसित होतो. तसेच श्रम आणि संस्कारांची शिदोरी आयुष्यभर जतन करावी असा संदेश देखील त्यांनी दिला.

    शिबिरातील स्वयंसेवकांमधून मयूर बडगुजर, खुशी चौधरी, सुजल बाविस्कर भारती भील या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट स्वयंसेवक अवॉर्ड देण्यात आला. या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ . के डी.गायकवाड व  राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका जागृती बारी यांनी केले तर आभार सौ. एस.बी.पाटील यांनी केले.

No comments