थेपडे विद्यालयात ‘कलामहोत्सव’चा जल्लोष; ४३६ विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने म्हसावदकर भारावले म्हसावद | प्रतिनिधी : समाधान पाटील (संपादक ...
थेपडे विद्यालयात ‘कलामहोत्सव’चा जल्लोष; ४३६ विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने म्हसावदकर भारावले
म्हसावद | प्रतिनिधी : समाधान पाटील
(संपादक : हेमकांत गायकवाड)
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी स्वातंत्र्य सैनिक पंढरीनाथ धडूराम थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २०२६ चे वार्षिक स्नेहसंमेलन व कलामहोत्सव अत्यंत उत्साहात व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. इयत्ता ५ वी ते १२ वीच्या एकूण ४३६ विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून आपला कलाविष्कार सादर केला. ‘पुष्पा–२’ चित्रपटातील महाकाली गाणे, ‘कोंबडा कापता है’ हे विनोदी गीत, नाना पाटेकर यांच्या ‘क्रांतीवीर’ चित्रपटातील गाजलेला संवाद तसेच जोशपूर्ण आदिवासी नृत्यांनी उपस्थित सुमारे दोन हजार पालक व नागरिकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन डॉ. केदारजी थेपडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले असून अध्यक्षस्थानीही तेच होते. यावेळी संस्थेच्या सचिव सुषमाताई थेपडे, एन.डी.एम. अडावदचे मुख्याध्यापक पी. डी. चौधरी, पर्यवेक्षक के. आर. कनकरे, डी.टी.एड कॉलेजचे प्राचार्य गोसावी, इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या संगीता चव्हाण, आर्यन इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य जितेंद्र गजरे, विलास महाजन, सचिन परदेशी व किशोर महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात शिवराज्याभिषेक सोहळा, देशभक्तीपर गीते, पोवाडा तसेच खान्देशची शान असलेल्या कानबाई गीतांवरील नृत्यांनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली. विद्यार्थ्यांच्या अभिनय, नृत्य व सांस्कृतिक सादरीकरणाने प्रेक्षक भारावून गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक जी. डी. बच्छाव यांनी केले तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक एस. के. भंगाळे यांनी मानले. सूत्रसंचालन एस. जे. पवार, वाय. पी. चिंचोरे, सचिन चव्हाण व एस. ए. पाटील यांनी केले. नियोजन व देखरेख पर्यवेक्षक के. पी. पाटील यांनी सांभाळली. तांत्रिक व साऊंडची जबाबदारी ए. सी. बाविस्कर व अरविंद चव्हाण यांनी पार पाडली. मेकअपची जबाबदारी डी. एम. सोनवणे व वाय. एन. शिंदे यांनी तर बक्षीस वितरण घोषणेचे काम व्ही. बी. पाटील व एस. व्ही. सोळंके यांनी केले. कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्ह डिजिटल प्रसिद्धीकरण प्रा. पराग पाटील व डी. एम. सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत विद्यालयाच्या शिस्तबद्ध व उत्कृष्ट आयोजनाची प्रशंसा केली.

No comments