adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मातंग चळवळीतील संघर्षशील नेतृत्व – गोविंद सूर्यवंशी..

 मातंग चळवळीतील संघर्षशील नेतृत्व – गोविंद सूर्यवंशी..          लातूर, जि. प्र(उत्तम माने) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) गोविंद सूर्यवंशी हे ...

 मातंग चळवळीतील संघर्षशील नेतृत्व – गोविंद सूर्यवंशी.. 


        लातूर, जि. प्र(उत्तम माने)

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

गोविंद सूर्यवंशी हे लातूर जिल्ह्यातील मातंग समाजाच्या अन्याय, अत्याचार व दडपशाहीविरोधात सातत्याने लढणारे एक प्रामाणिक, निष्ठावंत व संघर्षशील नेतृत्व आहे. तळागाळातील समाजाच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवणारे, अन्यायाविरुद्ध कधीही तडजोड न करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे गोविंद सूर्यवंशी.

समाजकार्याची हीच पार्श्वभूमी, सातत्यपूर्ण लढा आणि जनतेशी असलेली आपुलकी पाहूनच त्यांच्या पत्नी सौ. ज्योती गोविंद सूर्यवंशी यांना लांबोटा पंचायत समितीसाठी शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. 


ही उमेदवारी म्हणजे कार्याला दिलेली पोचपावती आहे.

याआधी तब्बल १५ वर्षे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये काम करूनही तळागाळातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलण्याचे काम घराणेशाहीने केले, हे वास्तव समाज विसरलेला नाही. संघर्ष करणाऱ्यांना संधी नाकारली गेली, आणि म्हणूनच आज परिवर्तनाची गरज आहे.

गोविंद सूर्यवंशी हे केवळ कार्यकर्ते नाहीत, तर

➡️ समाजात सतत सक्रिय

➡️ प्रामाणिक व निष्ठावंत

➡️ माणुसकी जपणारे, प्रेमळ स्वभावाचे

➡️ अन्यायाविरुद्ध लढणारे नेतृत्व आहेत.

त्याच मूल्यांची, त्याच विचारांची आणि जनतेसाठी काम करण्याची तयारी असलेल्या ज्योतीताई सूर्यवंशी यांना लांबोटा पंचायत समितीच्या भावी सदस्या म्हणून निवडून देणे, ही केवळ एका उमेदवाराची निवड नाही—

ती समाजाच्या आत्मसन्मानाची, हक्काची आणि परिवर्तनाची निवड आहे.

✊ चला, काम करणाऱ्यांना साथ देऊया.

✊ अशी भावना मतदारमध्ये होत आहे

No comments