सनपुले आश्रमशाळेत अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम; विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग अडावद प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा. नवीन व...
सनपुले आश्रमशाळेत अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम; विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग
अडावद प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा. नवीन वर्षाच्या निमित्ताने व "घर घर संविधान" उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी चोपडा तालुक्यातील सनपुले आश्रमशाळेत दिनांक १ जानेवारी २०२६ वार गुरुवार रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला.अनिस चे कार्याध्यक्ष
डॉ.अयुब आर.पिंजारी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय अहिरे,अनिल वाडे, मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील, मुख्याध्यापक नितीन पाटील हेही व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ.पिंजारी यांनी प्रत्यक्ष कृतीयुक्त सहभाग करून विद्यार्थ्यांना विविध प्रयोग व प्रात्यक्षिके करून दाखवली.
व्यसन माणसाला संपवते त्यापासून दूर जाणे,कोणी सांगतो म्हणून पटकन त्यावर विश्वास न ठेवणे,तर्कशुद्ध विचार करणे अशा नानाविध प्रकारचे संबोधन करताना विविध प्रयोग त्यांनी केले.हातावरची त्वचा तीन सेकंद तर जिभेवरची सहा सेकंद कापूर पेटवून ते सहन करू शकते. म्हणून भूत,बाधा,चेटकीण असे काहीही नसते.
अज्ञानी लोकांना काही भोंदूलोक कसे फसवतात त्याचे प्रत्यक्ष त्यांनी स्वतः प्रयोग करून दाखवले.पाण्यातला दिवा त्याच्या त्याच्या नाही तर कॅल्शियम कार्बोनेटमुळे जळतो. हा प्रयोग देखील त्यांनी करून दाखविला.उपशिक्षक अरविंद उत्तम मोरे,प्रमोद पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

No comments