यावल येथे जनसंघाचे स्व.हुतात्मा बापू वाणी यांना ५२ व्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी- (संपादक -:- हेमकांत गायकवा...
यावल येथे जनसंघाचे स्व.हुतात्मा बापू वाणी यांना ५२ व्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी-
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक,जनसंघाचे तात्कालिक जिल्हाध्यक्ष, राष्ट्रकार्याला समर्पित असे प्रखर व्यक्तिमत्व स्व.हुतात्मा बापू वाणी यांच्या ५२ व्या स्मृतीदिना निमित्ताने दि.१ जानेवारी २०२६ रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी यावलचे निलेश गडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक वसंतराव भोसले, प्रा.डॉ.सुनील नेवे (भुसावळ),भाजपाचे यावल तालुकाध्यक्ष उमेश फेगडे,नवनिर्वाचित नगरसेविका सौ.कल्पना वाणी,हुतात्मा बापू वाणी यांचे बंधू अंबादास(दादा) नेवे उपस्थित होते.उपस्थित सर्वांनी हुतात्मा बापू वाणी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर वसंतराव बापू भोसले,अविनाश नेवे,प्रा.सुनील नेवे,निलेश नेवे (जळगाव) यांनी बापूंच्या समर्पित जीवन कार्याविषयी माहिती दिली.त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. बापूंचे बंधू दादा नेवे तसेच जळगावच्या सौ.कल्पना नेवे संघाचे गीत गायले.हुतात्मा बापू वाणी हे फक्त नेवेवाणी समाजाची नसून ते सर्व समाजाचे समर्पित व्यक्तिमत्व होते.समाजसेवा व देशभक्तीने भारवलेले प्रखर असे हिंदुत्व विचारांचे व्यक्तिमत्व होते.हुतात्मा बापू वाणी यांचा येत्या पिढीला जीवन परिचय व्हावा या उद्देशाने त्यांच्या जीवनावर पुस्तक छापून त्याच्या दहा हजार प्रती सर्व समाजापर्यंत पोहचवायच्या आहे.तसेच भुसावळच्या अटल प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यस्तरीय निबंध स्पर्धा राबवायची आहे.जेणेकरून हुतात्मा बापू वाणी यांचे व्यक्तित्व व कर्तुत्व घराघरापर्यंत पोहचेल असे दोन उपक्रम येत्या काळात राबवायचे आहे व हिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रा. सुनिल नेवे यांनी मनोगतात सांगितले.यावेळी हुतात्मा बापू वाणी यांचे कुटुंब उपस्थित होते. अध्यक्षिय मनोगतानंतर सामुहिक राष्ट्रगीत म्हटले गेले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यावलचे किरण नेवे (सर)यांनी केले.याप्रसंगी साकळी,चुंचाळे,जळगाव येथील तसेच संपूर्ण यावल शहरातील नागरीक बंधू-भगिनी उपस्थित होते.

No comments