adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शहरात गुन्हेगारीला मोठा धक्का..मोक्का गुन्ह्यातील फरार सराईत आरोपी जेरबंद..एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई!

 शहरात गुन्हेगारीला मोठा धक्का..मोक्का गुन्ह्यातील फरार सराईत आरोपी जेरबंद..एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई!  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:...

 शहरात गुन्हेगारीला मोठा धक्का..मोक्का गुन्ह्यातील फरार सराईत आरोपी जेरबंद..एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई! 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर :-एमआय.डी.सी.पोलीस स्टेशन येथील मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी अटक करून गुन्हेगारी विरोधात मोठी कारवाई केली आहे.सदर कारवाईमुळे परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ३१७/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ११४(२), ११४(३), ३५२, ३५३(२), ३५४(१), ३७४(१), ३८४(६) तसेच भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्टचे कलम ७ सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ (मोका) अंतर्गत दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मयुर ऊर्फ अजय सोमनाथ गुळवे (वय २६ वर्षे, रा. लामखडे पेट्रोल पंपाजवळ, वेंगणी हॉटेल,एम.आय.डी.सी., जि.अहिल्यानगर) असे आहे. सदर आरोपी हा रेणुकामाता मंदिर परिसर,नागापूर येथे येणार असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि माणिक बी.चौधरी यांना मिळाल्यानंतर तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले होते पोलीस पथकाने सापळा रचून सदर ठिकाणी जाऊन आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले.त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील तपासाकरिता अटक करण्यात आली आहे.

सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये –

एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन गु. र. नं. ३७८/२०२२ भा.दं.वि. कलम ३०७, ३२६, ३२४, ३२३, ३३६ एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन गु. र. नं. २३६/२०१९ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन गु. र. नं. ६३३/२०२४ भा.दं.वि. कलम ३५४, ३०७, ४२७ कोतवाली पोलीस स्टेशन गु. र. नं. १७३/२०२१ भा.दं.वि. कलम ३२४, ३२३, ४०६, ५०६

अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पोलीस सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे,तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण विभाग शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि माणिक बी.चौधरी, पोलीस अंमलदार राकेश खेडकर, पोहेकॉ.राजू सुंदीक,पोहेकॉ.संदीप पवार,पोहेकॉ.सचिन अडबल, किशोर जाधव,नवनाथ दहिफळे,ज्ञानेश्वर आघाव यांनी केली आहे.

No comments