संत सेवेचे सुख अवर्णनीय संतच भगवंताची भेट करून देतात:- अनिल महाराज बार्शीकर इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर संत सेव...
संत सेवेचे सुख अवर्णनीय संतच भगवंताची भेट करून देतात:- अनिल महाराज बार्शीकर
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर संत सेवेतच खरे सुख असून संतच भगवंताची भेट घालून देतात मानवी जीवनाचे कल्याण करण्यासाठी संत अहोरात्र आपली साधना करीत असतात संत जीवन समजून घेण्यासाठी सानिध्यात राहणे आवश्यक आहे असे प्रतिपादन सामुहिक तुळशी अर्चन महोत्सवात तिसरे कीर्तन सेवा प्रसंगी अनिल महाराज बार्शीकर यांनी प्रतिपादन केले तर दुपारचे सत्रात रामायण कथा प्रसंगी शिव पार्वती विवाह सोहळा प्रसंग वर्णन करून मनू व शत रुपा यांचे तीर्थ भ्रमण कथा व नैमिषारण्य येथील ऋषी मुनींनी केलेले स्वागत व प्रसंगी मनुजी यांनी दिलेले तत्वज्ञान सविस्तर वर्णन करताना सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले
भक्ती महोत्सवात आमदार अमोल जावळे निर्मोही आखाडा महंत भरतदासजी महाराज डा ओमप्रकाश चौधरी पुंडलिक महाराज चिखलीकर श्याम शास्त्री नगराध्यक्ष सौ दामिनी सराफ व सर्व नगरसेवक उपस्थित होते मान्य वरांचे स्वागत चंद्रशेखर चौधरी मिलिंद वाघूलदे सिद्धेश्वर वाघूलदे किरण चौधरी राजेश महाजन अनिल नारखेडे विक्रांत नारखेडे सुनील नारखेडे शेखर चौधरी तुषार राणे यांनी स्वागत केले.


No comments