सिंहगड रोड पोलीस ठाणेचे नवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकरांनी स्वीकारला पदभार, तर पोलीस निरीक्षक दिलिप डाईगडे यांची गुन्हे शाखेत बदली! ...
सिंहगड रोड पोलीस ठाणेचे नवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकरांनी स्वीकारला पदभार, तर पोलीस निरीक्षक दिलिप डाईगडे यांची गुन्हे शाखेत बदली!
संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पुणे शहर पोलीस दलातील सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलिप दाईगडे यांची गुन्हे शाखेत बदली आहे. त्यांच्या रिक्त जागेवर नव्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून विनय पाटणकर यांची सिंहगड रोड पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी म्हणून पुणे शहरचे पोलीस आयुक्त डॉ. अमितेशकुमार यांच्या आदेशावरून नियुक्ती देण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर हे एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी पुणे शहर पोलीस दलात विविध पोलीस ठाण्यात आणि विविध पदावर उत्कृंष्ट सेवा बजावली आहे. पाटणकर हे कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत असतानाही त्यांनी तेथेही अवैध धंदे आणि गुन्हेगारींवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. तर सिंहगड रोड पोलीस ठाणेतील यापूर्वीचे पोलीस निरीक्षक दिलिप डाईगडे यांनीही पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून आपल्या कार्यकाळात सिंहगड रोड परिसरांत अवैध धंदे आणि गुन्हेगारींवर चांगलाच अंकुश ठेवला होता. पिस्तूल-जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर त्यांची चांगलीच करडी नजर राहिली. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील राहिले, त्यांच्या बदलीनंतर सिंहगड रोड पोलीस ठाण्याला पुन्हा खमक्या अधिकारी मिळाल्याचे परिसरांतील नागरिकांतून बोलले जात आहे.

No comments