adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पुनखेडा येथील जि.प.प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ४ साठी एकच शिक्षक; शिक्षण विभागाची उदासीनता?

 पुनखेडा येथील जि.प.प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ४ साठी एकच शिक्षक;  शिक्षण विभागाची उदासीनता?  रावेर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) प...

 पुनखेडा येथील जि.प.प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ४ साठी एकच शिक्षक; शिक्षण विभागाची उदासीनता? 


रावेर प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पुनखेडा (ता.रावेर, जि.जळगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुला-मुलींच्या शाळेत इयत्ता- पहिली ते चौथीचे वर्ग सुरू असतानाही फक्त एका शिक्षकावर संपूर्ण शाळा चालवली जात आहे. शाळेचा पट- 53 आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार एवढ्या पटावर किमान दोन शिक्षकांची नियुक्ती बंधनकारक असताना, संबंधित शिक्षण विभागाने मात्र याकडे डोळेझाक केल्याचे चित्र आहे.

एकाच शिक्षकावर चार वर्ग, प्रशासनिक कामकाज, BLO चे कार्य आणि मध्यान्ह भोजनाची जबाबदारी टाकण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे. लहान वयातील विद्यार्थ्यांना ना पुरेसा वेळ, ना गुणवत्तापूर्ण अध्यापन — असा सवाल पालक उपस्थित करत आहेत.

शासनाचे नियम फक्त कागदावरच आहेत का?

अनेक वेळा शिक्षक मागणी व तक्रारी करूनही अतिरिक्त शिक्षक न देणे हे शिक्षण विभागाचे अपयश असल्याची तीव्र नाराजी ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. भविष्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण, असा थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुनखेडा येथील जि.प.शाळेत तात्काळ अतिरिक्त शिक्षक नियुक्त न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा पालक व ग्रामस्थांनी दिला आहे.

No comments