गावठी पिस्तूल बाळगणारा सातारचा तरुण तासगांव पोलिसांच्या जाळ्यात, तासगांव पोलिसांची दमदार कामगिरी ! सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी ( सांगली...
गावठी पिस्तूल बाळगणारा सातारचा तरुण तासगांव पोलिसांच्या जाळ्यात, तासगांव पोलिसांची दमदार कामगिरी !
सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी ( सांगली जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासगांव पोलिसांचा मोठा घाव
अवैध दोन देशी पिस्तूल व जिवंत काडतुसांसह तरुण अटकेत; 1.50 लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
महाराष्ट्र पोलीस दलाच्या मार्गदर्शनाखाली तासगांव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवैध शस्त्रसाठ्यावर मोठी कारवाई करत दोन देशी बनावटीची पिस्टले (अग्रीशस्त्रे) व एक जिवंत काडतूस जप्त करून यामध्ये सातारच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. सांगली-मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
(दि. 13 जानेवारी) 2026 रोजी रात्री 23.40 वा. तासगांव पोलीस ठाण्यात गु. र. नं. 24/2026 अन्वये भारतीय शस्त्र कायदा कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस शिपाई सुरज राजाराम जगदाळे (पो.शि./2463) यांनी फिर्याद दिली आहे.
दि. 14 जानेवारी 2026 रोजी पहाटे 01.22 वा. गोपनीय बातमीदारामार्फत तासगांव ते मणेराजुरी रोडवरील चिंचणी फाट्याजवळ एक इसम गावठी पिस्तूल बाळगून थांबलेला असल्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ हालचाली करण्यात आल्या. पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकांने सापळा रचून संशयितास शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या संशयितांचे नाव सुजल रामचंद्र धनावडे (वय 20 ) रा. मेढा, ता. जावळी जि. सातारा ) असे असून पंचासमक्ष अंगझडती दरम्यान त्याच्याकडून
₹75,000 किंमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्टल (अग्रीशस्त्रे)
₹500 किमतीचे एक जिवंत काडतूस
असा एकूण ₹1,50,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर शस्त्रे बाळगण्याबाबत आरोपीकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले आहे. ( दि. 14/01/2026 ) रोजी पहाटे 02.32 वा. आरोपीस अटक करण्यात आली सदर गुन्ह्याचा अधिक तपास स.पो.नि. दीपक पाटील करीत आहेत. सदरची कामगिरी ही सांगलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि. दीपक पाटील यांच्यासह तासगांव पोलीस ठाण्याकडील आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई पार पाडली आहे. सदर कारवाईत तासगांव पोलीस ठाणे व सायबर पोलीस ठाणे सांगली येथील अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तासगांवच्या हद्दीत
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अवैध शस्त्रांवर कठोर कारवाई सुरूच राहणार तसेच कायद्यात आणि गुन्ह्यात कोणालाही माफी नाही असेही निर्वाचित तासगांव पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.


No comments