महामार्ग दुरुस्तीमुळे वाढलेल्या वाहतूक कोंडीत राहुरी पोलिसांचे उत्कृष्ट नियोजन अजीजभाई शेख राहाता (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर–म...
अजीजभाई शेख राहाता
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर–मनमाड महामार्गावर सध्या रस्ता दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर सुरू असून, त्यामुळे राहुरी शहरासह महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाढलेल्या वाहतुकीमुळे नागरिक व वाहनधारकांना गैरसोयींचा सामना करावा लागत असताना, राहुरी पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेने परिस्थितीवर प्रभावी नियंत्रण मिळवले आहे.
राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संजयजी ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार भाऊसाहेब आव्हाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल बापू फुलमाळी, रमेश दरेकर व संतोष ठोंबरे यांनी काटेकोर नियोजन करत महामार्ग व शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. योग्य मार्गदर्शन, पर्यायी मार्गांचा वापर व सततच्या नियोजनामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन वाहनांची ये-जा सुरळीत झाली आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रचंड वाहतूक दबाव असतानाही आपले कर्तव्य चोखपणे पार पाडल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, जनतेकडून तसेच प्रशासनाकडून त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक होत आहे.

No comments