मलेशियातील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत न्याहळोदच्या सिद्धार्थ वाघचे सुवर्णयश धुळे प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) धुळे तालुक्याती...
मलेशियातील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत न्याहळोदच्या सिद्धार्थ वाघचे सुवर्णयश
धुळे प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील रहिवासी सिद्धार्थ प्रकाश वाघ याने मलेशिया येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत दैदीप्यमान कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारताचे प्रतिनिधित्व करताना सिद्धार्थने अंतिम लढतीत थायलंडच्या पहेलवानाला चितपट करत विजय मिळवला. या यशामुळे धुळे जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्वल झाले आहे.
१९ वर्षाखालील ७० किलो वजन गटात सिद्धार्थची निवड झाली होती. अत्यंत अटीतटीच्या आणि उच्च दर्जाच्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने दाखवलेली ताकद, तंत्र आणि जिद्द विशेष कौतुकास्पद ठरली. या स्पर्धेस भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाची मान्यता असून ही स्पर्धा नोंदणीकृत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक खेळ संघटना समितीशी संलग्न आहे.
सिद्धार्थ वाघ हा न्याहळोद येथील सरपंच सौ. कविताताई प्रकाश वाघ आणि श्री. प्रकाश वाघ यांचा सुपुत्र आहे. त्याच्या या उज्वल यशाबद्दल न्याहळोद व कापडणे परिसरात सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

No comments