adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात सौ संगीता दर्यापूरकर करमळकर यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण

 ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात सौ संगीता दर्यापूरकर करमळकर यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण  किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अंतु...

 ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात सौ संगीता दर्यापूरकर करमळकर यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण 


किरण धायले मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अंतुर्ली ता. मुक्ताईनगर येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आर एस दर्यापूरकर यांच्या सुकन्या सौ. संगीताताई दर्यापूरकर कळमकर यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ज्ञानोदय मंडळ संचलित अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात  संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दर्यापूरकर यांचे तैल चित्राची प्रतिमा सौ संगीताताई दर्यापूरकर कळमकर यांनी दिली .तैल चित्राचे प्रतिमेचे अनावरण सार्वजनिक वाचनालयात ज्ञानोदय मंडळाचे अध्यक्ष एस.ए भोई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष एस ए भोई, उपाध्यक्ष शरद महाजन, सरपंच सौ सुलभाताई शिरतुरे, संचालक अनिल वाडीले गावातील प्रतिष्ठित नागरिक, वाचक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          याप्रसंगी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ. सुलभाताई शिरतुरे यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ संगीताताई दर्यापूरकर कळमकर होत्या गावातील सर्व नागरिक, शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. गावात विविध ठिकाणी सर्व संस्थांचे पदाधिकाऱ्यांनी ध्वजारोहण केले. संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तापिमाई दूध डेअरी,जि.प. मराठी मुलांची शाळा, कन्या शाळा ,उर्दू शाळा, मी.फ. तराळ विद्यालय व मुंगू रामजी महाजन ज्यू. कॉलेज तसेच कुसुमताई इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.

No comments