आमच्या राष्ट्रवादी परिवारांवर आज दुःखाचा डोंगर कोसळला, आधार आणि मायेची सावली हिरावून घेतली:-राज्य महिला आयोगाच्या सौ. रूपाली चाकणकरांनी जड ...
आमच्या राष्ट्रवादी परिवारांवर आज दुःखाचा डोंगर कोसळला, आधार आणि मायेची सावली हिरावून घेतली:-राज्य महिला आयोगाच्या सौ. रूपाली चाकणकरांनी जड अंतःकरणाने वाहली श्रद्धांजली !
संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
28 जानेवारी संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळाचा दिवस ठरला आहे. आपल्या दादा नावाच्या व्यक्तीच्या सावलीत असणाऱ्या आम्हां सर्वांना काळाने पोरक केलं, आमच्या डोक्यावरील आधाराची आणि मायेची सावलीच हिरावून घेतली:- राज्य महिला आयोग सौ. रूपाली चाकणकरांनी जड अंतःकरणाने वाहिली श्रद्धांजली... सूर्याच्या साक्षीने दादांचे काम सुरू व्हायचे काम घेवुन येणारा प्रत्येक माणसाला दादा आपले काम करतील हा विश्वास वाटायचा. हीच खरी दादांची ओळख होती दादा स्पष्टपणे जितके बोलायचे त्यांच्या कैक पटीने जास्त त्यांच्या मनात प्रत्येकाबद्दल नेहमीच आदर आणि आपुलकी असायची. आम्हां सर्वांना दादांची भीती होती. संघटनेच्या कामकाजात देखील ते अतिशय स्पष्टपणे सर्व गोष्टी समजून सांगायचे. शेवटच्या घटकाला केंद्रस्थानी ठेवून आपल्याला पक्ष संघटन मजबूत करायचे आहे. महिलांना राजकारणात जास्तीत जास्त प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यायची आहे असे सांगणारे लाडक्या बहिणींचे हक्काचे दादा होते. आजच्या घटनेनंतर खरोखर व्यक्त होण्यासारखे काहीच उरलेले नाही, आपल्या सर्व राष्ट्रवादी परिवारावर आमचे आदर्श असलेल्या नेतृत्वाला आपण सर्वजण, नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आज पोरका झालो आहे. स्वप्नातही वाटलं नव्हतं इतक्या लवकर आपल्या सर्वांना दादा सोडून जातील, आणि महाराष्ट्राला भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्याची वेळ येईल म्हणून पण काळाला आणि वेळेला कोणी थांबू शकत नाही... दादांच्या अचानक जाण्यामुळे सर्वांचे डोळे पाणवले आहेत. दादांना जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली!

No comments