रावेर तालुक्यातील पाल गावात ग्रामीण शिबिर यशस्वी – रोहन सुरेश हिवरे यांनी गावावर निरीक्षण व लेखन केले रावेर ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमका...
रावेर तालुक्यातील पाल गावात ग्रामीण शिबिर यशस्वी – रोहन सुरेश हिवरे यांनी गावावर निरीक्षण व लेखन केले
रावेर ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर:- लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगाव (MSW/BSW) यांच्या वतीने दिनांक ०२ ते ०८ जानेवारी २०२६ या कालावधीत रावेर तालुक्यातील पाल गावात ग्रामीण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थी प्रत्यक्ष गावावर निरीक्षण (Observation) करीत, गावातील सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक परिस्थितीचा सखोल अभ्यास केला. यासोबत विद्यार्थ्यांनी गावावर लेखन (Documentation/Writing) करून सर्व निरीक्षणे नोंदवली.
PRA पद्धतीचा वापर:- शिबिरात विद्यार्थ्यांनी सहभागी ग्रामीण मूल्यमापन (Participatory Rural Appraisal – PRA) पद्धतीचा वापर करून गावाचा सामाजिक नकाशा (Social Mapping) आणि संसाधन नकाशा (Resource Mapping) तयार केला. तसेच गावातील विविध घटकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, गरजा व अपेक्षा जाणून घेतल्या.विद्यार्थ्यांचे निरीक्षण असे होते की गावातील बहुतेक कुटुंबांचे मासिक उत्पन्न सरासरी ₹१०,००० इतके आहे. रोजगाराच्या अभावामुळे अनेक कुटुंबे वर्षभरातील काही काळ गावाबाहेर स्थलांतरित होतात, ज्याचा थेट परिणाम मुलांच्या शिक्षणावर होतो. स्थलांतरामुळे शाळा सोडण्याचे प्रमाण वाढते आणि निरक्षरतेचे प्रमाणही वाढते.
स्वच्छता व शासकीय योजना
शिबिरादरम्यान गावातील स्वच्छतेची समस्या, घरकुल योजना, लाडकी बहीण योजना व विधवा योजना यांचा सखोल अभ्यास करण्यात आला. अभ्यासातून हे लक्षात आले की गावातील कुटुंबांसाठी स्थायी व स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून स्थलांतर कमी होईल आणि मुलांना नियमित शिक्षण मिळेल.शिकवण शिबिरात सहभागी रोहन सुरेश हिवरे, रहिवासी कुसुंबा, तालुका रावेर, यांनी सांगितले:
"या शिबिरातून मला समजले की समाजकार्य हे केवळ सैद्धांतिक नाही, तर प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आहे. PRA ही पद्धत ग्रामीण समस्यांचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. "शिबिरात सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शकांनी ग्रामीण विकासासाठी स्थानिक पातळीवर पुढाकार घेण्याचे ठाम उद्दिष्ट ठेवल्याचेही सांगितले.

No comments