adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पद्मश्री सन्मानित तारपा वादक भिकल्या लाडक्या ढिंडा यांना चोपड्यातून कलात्मक गौरव

 पद्मश्री सन्मानित तारपा वादक भिकल्या लाडक्या ढिंडा यांना चोपड्यातून कलात्मक गौरव  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पालघर येथील ...

 पद्मश्री सन्मानित तारपा वादक भिकल्या लाडक्या ढिंडा यांना चोपड्यातून कलात्मक गौरव 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पालघर येथील आदिवासी पारंपरिक तारपा वाद्याचे ज्येष्ठ कलाकार, ९२ वर्षीय भिकल्या लाडक्या ढिंडा यांना नुकताच भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आदिवासी संस्कृतीचा अमूल्य ठेवा असलेले तारपा हे सुमारे ४०० वर्षांपूर्वीचे प्राचीन वाद्य असून, आजही ते आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक मानले जाते.  भिकल्या ढिंडा यांच्या या उल्लेखनीय सन्मानाबद्दल त्यांना अभिनंदन व शुभेच्छा देण्यासाठी चोपडा येथील आंतरराष्ट्रीय चित्रकार अनिलराज पाटील यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत कलात्मक अभिवादन केले आहे. पेन-इंक या माध्यमाचा वापर करून त्यांनी तारपा वाद्याचे सखोल व भावपूर्ण रेखाटन साकारले असून, या चित्रातून आदिवासी परंपरेचा गौरव अधोरेखित केला आहे. 

विशेष म्हणजे तारपा वाद्याचा आकार राष्ट्रीय पक्षी मोर यासारखा असल्याचे या कलाकृतीत ठळकपणे मांडण्यात आले आहे. या रेखाटनामुळे तारपा वाद्याचे सौंदर्य, त्यामागील सांस्कृतिक महत्त्व आणि भिकल्या ढिंडा यांच्या योगदानाला कलात्मक सलाम करण्यात आला आहे. आदिवासी कला, संगीत आणि संस्कृतीच्या जतनासाठी केलेल्या भरीव योगदानामुळे भिकल्या लाडक्या ढिंडा यांना मिळालेला पद्मश्री सन्मान हा संपूर्ण आदिवासी समाजासाठी अभिमानाची बाब ठरत असून, अनिलराज पाटील यांच्या या अभिवादनाने त्या सन्मानाला कलात्मक साज चढला आहे.

No comments