धनाजी नाना महाविद्यालयात एनएसएस श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचा उत्साहात प्रारंभ इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर धनाजी...
धनाजी नाना महाविद्यालयात एनएसएस श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचा उत्साहात प्रारंभ
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने आयोजित श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचा आज उत्साहात प्रारंभ झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर शिबिराचे उद्घाटन मोहमांडली येथील सरपंच मा. रजियाबाई तडवी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी तापी परिसर विद्या मंडळ, फैजपूरचे उपाध्यक्ष मा. प्रा. डॉ. सुधाकर काशिनाथ चौधरी होते.
यावेळी तापी परिसर विद्या मंडळाचे सचिव मा. प्रा. एम. टी. फिरके, सहसचिव मा. नंदकुमार भंगाळे, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. आर. बी. वाघुळदे, मोहमांडली आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मा. आर. टी. कुमावत, पोलिस पाटील मा. रमजान तडवी, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतीश दत्तात्रय पाटील, प्रा. डॉ. सविता कलवले, प्रा. विकास वाघुळदे तसेच एनएसएसचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराची यावर्षीची थीम “शाश्वत विकासासाठी युवक : पाणलोट व्यवस्थापन आणि पडीत जमीन विकासावर विशेष भर” अशी असून, युवकांनी पर्यावरण संवर्धन, जलसंधारण व सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात केले. शिबिराचा कालावधी 7 ते 13 जानेवारी 2026 असा आहे. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतीश दत्तात्रय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सविता कलवले यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. विकास वाघुळदे यांनी मानले. अध्यक्षीय मार्गदर्शन मा. प्रा. डॉ. सुधाकर काशिनाथ चौधरी यांनी केले. यावेळी सहसचिव मा. नंदकुमार भंगाळे तसेच प्राचार्य मा. डॉ. आर. बी. वाघुळदे यांनीही स्वयंसेवकांना सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे महत्त्व पटवून दिले.


No comments