भारत विद्यालयात पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सन्मान इदू पिंजारी फैजपूर - (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथुन जवळच असलेल्या...
भारत विद्यालयात पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सन्मान
इदू पिंजारी फैजपूर -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथुन जवळच असलेल्या न्हावी येथील भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पत्रकार दिनाचे औचित्य साधून गावातील पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला. सुरुवातीस एल आर सुपे यांनी पत्रकार दिनाबद्दल माहिती सांगितली. नंतर ललित कुमार फिरके, पी के चौधरी, संतोष बारी, संजय बारी, रवी कोलते या पत्रकार बांधवांचा सन्मान मुख्याध्यापक व्ही बी वारके, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक डी एच तळले, उपमुख्याध्यापिका सौ.संगीता फिरके, पर्यवेक्षक ए एस ठोसर यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्याध्यापक व्ही बी वारके यांनी मनोगत व्यक्त करताना पत्रकार हा समाजाला दिशा दाखवणारा दिशादर्शक असतो असे सांगितले. तसेच वेळोवेळी आमच्या शाळेच्या बातम्या प्रकाशित केल्याबद्दल आभार सुद्धा मानले. कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षिका सौ.शोभा तळले,आर आय तडवी, प्राथमिक विभागाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.शेवटी पत्रकार पी के चौधरी यांनी आमच्या पत्रकार बांधवांचा सन्मान केला त्याबद्दल आभार मानले.

No comments