adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

किसान महाविद्यालयात राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 किसान महाविद्यालयात राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन  पारोळा प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकव...

 किसान महाविद्यालयात राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन 


पारोळा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पारोळा येथील किसान महाविद्यालयात सोमवार दि. १२ जानेवारी २०२६ रोजी युवा दिनाचे औचित्य साधून स्वराज्य प्रेरीका राजमाता जिजाऊ यांच्या ५२७ व्या जयंतीनिमित्त आणि स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.एच. सोनवणे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. डी. बी. साळुंखे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथम राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील रासेयो एकक मार्फत स्वदेशी संकल्प रॅली तथा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. बी. पाटील यांनी केले. द्वितीय वर्ष विज्ञान वर्गातील रासेयो स्वयंसेवक विद्यार्थीनी शुभांगी पाटील यांनी राजमाता माँसाहेब जिजाऊंच्या जीवनापटावर प्रकाश टाकत सर्वधर्मसमभाव, सामाजिक न्याय, समता, बंधुता, समाजहित, स्त्री सक्षमीकरण अशा लोककल्याणकारी आणि पुरोगामी विचारांच्या माध्यमातून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले तसेच स्वराज्य निर्माण करण्याचा प्रचंड आत्मविश्वास देखील त्यांनी शिवरायांमध्ये निर्माण केल्याबाबतचे मत मांडले. तसेच प्रथम वर्ष विज्ञान वर्गातील रासेयो स्वयंसेवक विद्यार्थी स्वामी विवेकानंद यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात रामकृष्ण मिशन या सामाजिक संघटनेची स्थापना करून देशातील युवकांमध्ये समाजातील अनिष्ट रूढी आणि स्वातंत्र्यबाबत जाणीव जागृती करणाऱ्या सामाजिक कार्याचे योगदान अविस्मरणीय असे असुन आजच्या तरुण आणि तरुणींसाठी ते निश्चितच दिशादर्शक असल्याचे मत व्यक्त केले. उपप्राचार्य डॉ.जी.एच. सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून जागतिक धर्म परीषदेचा दाखला देत स्वामी विवेकानंद यांचे मानवतावादी विचार आणि विधायक स्वरूपाचा भारतीय राष्ट्रवाद यावर विचारमंथन केले. आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. काकासाहेब गायकवाड यांनी मांडले.

No comments