adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ब्रिजखाली गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

 ब्रिजखाली गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई   सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर:- जि...

 ब्रिजखाली गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:- जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यां विरोधात सुरू असलेल्या मोहिमे अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मिरजगांव पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत एका तरुणाला गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.त्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.दि.26 जानेवारी 2026 रोजी पथक मिरजगांव पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मिरजगांव शिवारात क्रांतीसूर्य महात्मा फुले ब्रिजखाली एक इसम विनापरवाना गावठी कट्टा बाळगून थांबलेला आहे. मिळालेल्या माहितीची खात्री करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिरजगांव पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेत तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

ब्रिजखाली संशयित इसम आढळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सदर इसमाने आपले नाव संग्राम सुनिल जगताप (वय 23), रा. संतोषनगर,कात्रज, पुणे असे सांगितले.त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 35 हजार रुपये किमतीचा एक गावठी पिस्टल (अग्निशस्त्र) व 3 हजार रुपये किमतीचे तीन जिवंत काडतूस असा एकूण 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी पोलीस अंमलदार भाऊसाहेब राजू काळे (नेम – स्थानिक गुन्हे शाखा,अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरून मिरजगांव पोलीस ठाण्यात गु.र.नं. 30/2026 अन्वये आर्म ॲक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मिरजगांव पोलीस स्टेशन करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक  श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/समीर अभंग, पोलीस अंमलदार ऱ्हदय घोडके, भिमराज खर्से,शामसुंदर जाधव, अमोल कोतकर,भाऊसाहेब काळे,मनोज साखरे,महादेव भांड,मिरजगांव पोलीस स्टेशनचे सपोनि/विजय झंजाड,पोलीस अंमलदार सुनिल खैरे,समीर सय्यद,अशोक रक्ताटे यांनी केली आहे.

No comments