adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एमआयडीसीत मध्यरात्रीचा थरार..! एकट्या महिलेवर प्राणघातक हल्ला करणारे सराईत गुंड गजाआड

एमआयडीसीत मध्यरात्रीचा थरार..! एकट्या महिलेवर प्राणघातक हल्ला करणारे सराईत गुंड गजाआड  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अह...

एमआयडीसीत मध्यरात्रीचा थरार..! एकट्या महिलेवर प्राणघातक हल्ला करणारे सराईत गुंड गजाआड 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:- नवनागापूर परिसरात घरात घुसून महिलेवर धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला करत जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. फिर्यादी अनिता सुखदेव काळापहाड (वय ३५, रा. तलाठी कार्यालयामागे,साईराजनगर, नवनागापूर) या दि.२२ जानेवारी रोजी रात्री सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घरी झोपलेल्या असताना दोन अज्ञात चोरट्यांनी बेधडकपणे घरात प्रवेश केला.आरोपींनी धारदार हत्याराने हल्ला करून त्यांना जखमी केले व घरातील सोन्याचे दागिने,मोबाईल व रोख रक्कम असा एकूण सुमारे २ लाख ४० हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचा तपास सुरू असताना एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून प्रेम नरेंद्र भाकरे (वय २२, रा.नागापूर,गावठाण) व अनिकेत उमेश साठे (वय २१, रा.पितळे कॉलनी,नागापूर) या दोघांना ताब्यात घेतले.पोलिसी चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून प्रेम भाकरेवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात आठ,तर अनिकेत साठेवर चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव करत असून सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक विनोद परदेशी, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव,पोलीस अमलदार राकेश खेडकर,राजू सुद्रिक,संदीप पवार,सचिन अडबल,नवनाथ दहिफळे,राजेश राठोड,अक्षय रोहकले,सुरज देशमुख,ज्ञानेश्वर आघाव,राहुल गुंडू यांनी केली आहे.

No comments