पत्रकार दिनी कर्तृत्वांचा सन्मान (उपक्रम प्रेस क्लब खामगाव च्या वतीने) पल्लवी पाटील खामगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) खामगाव: पत्रका...
पत्रकार दिनी कर्तृत्वांचा सन्मान
(उपक्रम प्रेस क्लब खामगाव च्या वतीने)
पल्लवी पाटील खामगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
खामगाव: पत्रकार दिनानिमित्त प्रेस क्लब खामगाव रजि नं. महा. - ३२९/१९, एफ-१८४३२ च्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदा ही समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा दि.६ जानेवारी २०२६ रोजी सन्मान करून विभिन्न पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त कर्तृत्ववान नागरिकांचं तसेच विभिन्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना जिल्हा भूषण, समाज गौरव,उद्योग, कार्यगौर विधी सेवा स्वर्गीय गोवर्धनशेठ गोयंनका स्मृती प्रित्यर्थ पुरस्कार सह पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार करण्यात येईल.
खरं म्हणजे तर हा दिवस पत्रकारांच्या सन्मानाचा आहे, परंतु प्रेस क्लब खामगांव हे मनाचा मोठेपणा दाखवित समाजात चांगलं कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांना आणखी चांगले कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करीत असतो. सदरचा कार्यक्रम हा येथील कोल्हटकर स्मारक मंदिरामध्ये दिनाक ६ जानेवारी२६ रोजी दुपारी ४वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रेस क्लब खामगावच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
No comments