मोहराळा येथे आज पासून श्रीमद भागवत कथेचे आयोजन भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : येथून जवळच असलेल्या मोहराळा ये...
मोहराळा येथे आज पासून श्रीमद भागवत कथेचे आयोजन
भरत कोळी यावल ता.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : येथून जवळच असलेल्या मोहराळा येथे श्री स्वामीनारायण मंदिरात आज पासून ते २३ जानेवारी दरम्यान श्रीमद देवी भागवत कथा व भक्त चिंतामण पंचदिनात्मक यज्ञाचा सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे.
हा सप्ताह मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा दहा वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे .सप्ताह कथेचे वक्ते म्हणून स्वामी भक्ती जीवनदासजी स्वामी विश्व प्रकाशदास जी ् अनंत प्रकाश दास जी व संत वल्लभ दास जी हे करणार आहेत .कथेची रूपरेषा पुढील प्रमाणे दिनांक १६ रोजी सायंकाळी चार वाजता पोथी यात्रा .सायंकाळी साडेसहा वाजता मंडप उद्घाटन .दिनांक १७ रोजी सकाळी ९:३०.मंगल प्रवचन व कथा प्रारंभ . कथेची वेळ सकाळी साडे आठ ते साडे अकरा व दुपारी साडेतीन ते साडेसहा. सकाळी साडेआठ वाजता भक्त चिंतामणी यज्ञ. दिनांक १८ रोजी सकाळी साडेपाच वाजता पुंडलिक चारित्र.शकोतसव दुपारी बारा वाजता. दिनांक १९ रोजी सकाळी साडेपाच वाजता नवरात्री उत्साह वीस जानेवारी रोजी घनश्याम उत्सव .परमपूज्य लाल जी महाराज यांचे सायंकाळी साडेपाच वा आगमन. २१ जानेवारी रोजी सकाळी पाच वाजता चिंतामणी भक्ती पूर्णाहुती होईल. सकाळी साडेपाच वा अन्नकूट आरती महेशासुर वध सुरुवात संध्याकाळी साडेपाच वाजता २२ जानेवारी रोजी हरिभक्त परायण संजय महाराज मोहराळा यांचे रात्री आठ वाजता कीर्तन २२ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता राजोपचार पूजा व शिव सती विवाह. संध्याकाळी साडेपाच वाजता. २३ जानेवारी रोजी कथा पूर्ण होईल. सकाळी 11 वाजता भव्य शिधापत्र वाचन .सात वाजता गंगावतार स काळी साडेदहा वाजता . कथा पूर्णविराम सकाळी अकरा वाजता. महाप्रसाद दुपारी साडेबारा वाजता .आणि गावातून भव्य दिंडी सोहळा सायंकाळी पाच वाजता काढण्यात येणार आहे. तरी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमात जिल्हाभरातून अनेक मान्यवर व संत महापुरुष. शास्त्री उपस्थित राहणार आहेत, गुजरात महाराष्ट्र येथून शास्त्रीजी येणार आहेत

No comments