adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात संपन्न

 महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात संपन्न  चोपडा प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता ओळखून त्यांना स्पर...

 महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात संपन्न 


चोपडा प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता ओळखून त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी लहानपणापासूनच तयार करण्याच्या उद्देशाने घेण्यात येणारी महाराष्ट्र टॅलेंट सर्च (MTS) परीक्षा दिनांक २५ जानेवारी, रविवार रोजी चोपडा येथील बालमोहन विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाली. सकाळी ११ ते १ या वेळेत सलग दोन तास परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षेसाठी इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी, सहावी व सातवी या वर्गांतील एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका स्वतंत्र स्वरूपात देण्यात आल्या होत्या. ही परीक्षा महाराष्ट्र व गोवा राज्यात एकाच दिवशी घेण्यात आली.

सदर परीक्षेचे केंद्र संचालक म्हणून जळगाव येथील एस. के. पाटील यांनी संपूर्ण कामकाजावर नियंत्रण ठेवत यशस्वी मार्गदर्शन केले. तसेच बालमोहन विद्यालयाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पूर्णवेळ उपस्थिती देत परीक्षेचे सर्व कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

परीक्षेचे पर्यवेक्षण चोपडा शिक्षण मंडळ संचलित अध्यापक विद्यालयाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले. हे पर्यवेक्षण अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य किरण पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली  प्राध्यापक संजय देशमुख व प्राध्यापिका पूजा माळी यांच्या सहकार्याने शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडले.

     विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान २४ गुण व एकूण ६० गुण मिळवणे आवश्यक आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, या उद्देशाने प्रत्येक केंद्राचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण होऊन स्पर्धा परीक्षांची तयारी लहान वयापासूनच व्हावी, या हेतूने एमटीएस परीक्षेचे आयोजन करण्यात येते. या परीक्षेसाठी चोपडा तालुक्यातील जिल्हा परिषद, खाजगी प्राथमिक, माध्यमिक तसेच इंग्लिश मीडियम शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. एमटीएस परीक्षेला तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सदर परीक्षेचे एकूण नियोजन व अंमलबजावणी तालुका समन्वयक आर. डी. पाटील यांनी पाहिले. पर्यवेक्षणाचे काम दीक्षा शिरसाट, देवयानी कोळी, साक्षी शिंदे, वैष्णवी महाजन, हर्षदा पाटील, भूमिका सैंदाणे, प्रणाली खैरनार, भक्ती जाधव, राजश्री पाटील, रोशनी पाटील, सविता ठाकूर, निकिता धनगर, वैष्णवी धनगर, दिव्यानी धनगर, उर्मिला बारेला, नंदिनी बारेला, आरती कोळी, राधिका सोनवणे, वर्षा भिल्ल, प्रियंका कोळी, झिंगुबाई जाधव, साक्षी पावरा, दिव्या बारेला, सपना धनगर, देवेंद्र वानखेडे आदींनी अत्यंत जबाबदारीने पर्यवेक्षणाचे काम पाहिले...

No comments