पत्रकार दिनाचे औचित्य साधत यावलमध्ये भव्य रक्तदान शिबिर आचार्य बालशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम भरत कोळी यावल ता. प्रतिनिध...
पत्रकार दिनाचे औचित्य साधत यावलमध्ये भव्य रक्तदान शिबिर
आचार्य बालशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बालशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधत, शेतकी संघ यावल येथे आयोजित केला असून यावल तालुका पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने उद्या मंगळवार दि. ६ जानेवारी रोजी यावल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील रक्तपेढी रक्त संकलनाचे कार्य करणार असून, सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा व तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती राहणार आहे.
पत्रकार दिन हा केवळ गौरवाचा नव्हे तर समाजाप्रती जबाबदारी जपण्याचा दिवस असल्याचे अधोरेखित करत, रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून समाजहितासाठी पुढाकार घेण्याचा संदेश यावल तालुका पत्रकार संघाने दिला आहे. या शिबिरात यावल शहर व परिसरातील नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावल तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे. “रक्तदान — श्रेष्ठ दान” या भावनेतून आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

No comments