adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल नगरपालिकेच्या ठेकेदारांचा मनमानी कारभार; गटारे तुंबून नागरिकांचे आरोग्य धोक्यात

 यावल नगरपालिकेच्या ठेकेदारांचा मनमानी कारभार; गटारे तुंबून नागरिकांचे आरोग्य धोक्यात  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवा...

 यावल नगरपालिकेच्या ठेकेदारांचा मनमानी कारभार; गटारे तुंबून नागरिकांचे आरोग्य धोक्यात 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल नगरपालिकेच्या हद्दीतील विरार नगर, गंगा नगर तसेच इतर कॉलनी परिसरात गटारांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, अनेक दिवसांपासून गटारे तुंबलेली असल्याने घाण पाणी रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे.

या परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांना मलेरिया, डेंग्यू, त्वचारोग यांसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रारी करूनही नगरपालिकेचे संबंधित ठेकेदार व आरोग्य विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.नगरपालिकेच्या ठेकेदारांचा हा मनमानी व निष्काळजी कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.

या संदर्भात नागरिकांनी माननीय कदीर खान (यावल) यांच्याकडे निवेदन सादर करून संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करून गटारे साफ करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशी समस्या उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेतली नाही तर आपण— कदीर खान, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष, यावल शहर — तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. 


No comments